विश्वविजेतेपद पाच वेळा मिळविणाऱ्या विश्वनाथन आनंद या भारतीय ग्रँडमास्टर खेळाडूला आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या फेरीत लिवॉन आरोनियनशी खेळावे लागणार आहे. अर्मेनियाच्या लिवॉनला अग्रमानांकन मिळाले आहे.
आनंदला नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध विश्वविजेतेपद गमवावे लागले होते. पहिल्या लढतीत आनंदला पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळण्याची संधी आहे. त्यानंतर त्याला व्हॅसेलीन तोपालोव्ह (बल्गेरिया) व शाख्रीयर मामेद्यारोव्ह (अझरबैजान) यांच्याविरुद्ध काळ्या मोहरांच्या साहाय्याने खेळावे लागणार आहे. आठ खेळाडूंमध्ये अव्वल साखळी पद्धतीने ही स्पर्धा होत असून स्पर्धेतील विजेता खेळाडू विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याच्याशी यंदा खेळणार आहे. कार्लसन याने गतवर्षी आनंदवर मात करीत विश्वविजेतेपद मिळविले होते.
पहिल्या फेरीतील अन्य लढतीत दिमित्री आंद्रेकीन याला व्लादिमीर क्रामनिकशी खेळावे लागणार आहे, तर सर्जी कर्जाकिनपुढे पीटर स्वेडलरचे आव्हान असेल. शाख्रीयर व तोपालोव्ह यांच्यात पहिल्या फेरीची लढत होईल.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viswanathan anand faces top seed aronian in the opener in zurich chess challenge
First published on: 13-03-2014 at 12:10 IST