Asia Cup Wanindu Hasaranga Tease Abrar Ahmed video: आशिया चषक सुपर फोर सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्यानं श्रीलंकान प्रथम फलंदाजी करताना १३३ धावा करू शकला. या सामन्यात पाकिस्तानच्या अबरार अहमदने हसरंगाला चिडवलं. पण हसरंगाने त्याला व्याजासकट उत्तर दिलं आहे.
श्रीलंकेचे फलंदाज पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीसमोर मैदानावर टिकू शकले नाहीत. फक्त कामिंदू मेंडिसने ४४ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. तर इतर कोणतेच फलंदाज १५ धावांच्या पुढे जाऊ शकले नाही. हसरंगा आणि कामिंदू मेंडिस यांनी संघाचा डाव सावरला. पण हसरंगा १५ धावा करत अबरार अहमदच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.
हसरंगाला बोल्ड करत अबरार अहमदने त्याचं सिग्नेचर सेलिब्रेशन केलं आणि त्याला चिडवलं. हसरंगा श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू आहे, जो विकेट घेतल्यानंतर दोन हातांनी त्याचं खास सेलिब्रेशन केलं. हसरंगाचं सेलिब्रेशन खूप प्रसिद्ध आहे आणि त्याला बाद केल्यानंतर अबरारने त्याला चिडवत त्याचं सेलिब्रेशन केलं. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
अबरार अहमदने हसरंगाला चिडवून केली मोठी चूक
हसरंगा बाद झाल्यानंतर शांतपणे मैदानाबाहेर गेला, पण हसरंगा काही मैदानावरचा प्रसंग विसरला नव्हता. पाकिस्तानचा संघ फलंदाजीला उतरला तेव्हा त्यांनी पहिल्या ५ षटकांत चांगली फलंदाजी केली, पण सहाव्या षटकात मात्र त्यांना सलग दोन धक्के बसले. तीक्ष्णाने तिसऱ्या चेंडूवर फरहानला बाद केलं, तर नंतर पाचव्या चेंडूवर फखर जमान बाद झाला.
हसरंगाने तीक्ष्णाच्या चेंडूवर उजव्या बाजूला डाईव्ह करत एक कमालीचा डाईव्ह करत झेल टिपला. जमिनीच्या अगदी जवळ असलेला हा झेल हसरंगाने उत्कृष्टरित्या टिपला आणि एकाच षटकात पाकिस्तानला दोन धक्के बसले. हसरंगाने हा झेल टिपल्यानंतर अबरार अहमदला चिडवलं. अबरारने इमर्जिंग आशिया चषकात अभिषेक शर्माला बाद केल्यानंतर हाताची घडी घालून भूवया वर करत बाहेर जाण्यास सांगितलं होतं. हसरंगाने अगदी असंच सेलिब्रेशन केलं.
यानंतर हसरंगा सातवे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा त्याने या षटकाती चौथ्या षटकात सईम अयुबला क्लीन बोल्ड केलं. ही विकेट घेतल्यानंतर सुद्धा हसरंगाने पुढे जात हाताची घडी घातली आणि अगदी सारखंच सेलिब्रेशन केलं. हसरंगाने त्याला चिडवल्याचा अगदी व्याजासकट बदला घेतला. याचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.