ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना अष्टपैलू वॉशिंगटन सुंदरनं संयमी अर्धशतक झळकावलं. सुंदरनं शार्दुल ठाकूरसोबत सातव्या गड्यासाठी १२३ धावांची भागिदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. गोलंदाजी करताना तीन बळी घेतले शिवाय फलंदाजी करताना सुंदरनं निर्णायक ६२ धावांची खेळी केली. या अष्टपैलू कामगिरीमुळे सुंदरनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. निर्णायक क्षणी अर्धशतकी खळी करत सुंदरनं कोट्यवधी क्रीडाप्रेमींची मनं जिंकली आहेत. पण सुंदरच्या वडिलांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

वॉशिंगटन सुंदरचे वडील एम. सुंदर यांनी एका स्थानीक एजेन्सीसोबत बोलताना सुंदरच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाली की, ‘सुंदरला आपल्या अर्धशतकाला शतकामध्ये रुपांतर करायला हवं होतं. सिराज मैदानावर आल्यानंतर सुंदरनं आक्रमक फलंदाजी करत षटकार आणि चौकारानं धावा काढायला पाहिजे होत्या. मोठे फटके लावण्यात तो तरबेज आहे. सुंदरला फटकेबाजीसाठी ओळखलं जातं. बहुतेक त्यानं ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येसवळ पोहचवण्याबाबत विचार केला असेल.’

आणखी वाचा- …म्हणून हिंदू कुटुंबात जन्मलेल्या मुलाचं नाव ठेवलं ‘वॉशिंग्टन’; जाणून घ्या वॉशिंग्टन सुंदर नावाची रंजक कथा

पुढे ते म्हणाले की, सुंदरसोबत माझं दररोज बोलणं होतं. शनिवारीही आमचं बोलणं झालं होतं. त्यावेळी त्याला म्हणालो होतो की, संधी मिळाली तर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करायला हवा .

एक नंबर! असा षटकार तुम्ही कधी पाहिलात का?; पाहा व्हिडीओ

वॉशिंगटन सुंदरनं फक्त १२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यानंतरही त्याला संधी देण्यात आली आहे. २०१६-१७ मध्ये तामिळनाडूकडून खेळताना अभिनव मुकंदसोबत डावाची सुरुवात करताना सुंदरनं १०७ धावांची भागिदारी केली होती.