India vs Australia 2023 3rd ODI Match Updates in Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा निर्णायक सामना चेन्नईत होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांमध्ये सर्वबाद २६९ धावा केल्या. पण ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना कुलदीपच्या गोलंदाजीवर एक टर्निंग पॉईंट मिळण्याची शक्यता होती. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १२५ वर असताना कुलदीपने डेव्हिड वॉर्नरला २३ धावांवर असताना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या अॅलेक्स कॅरीलाही कुलदीपने गुगली टाकून गोंधळात टाकलं होतं. कुलदीपने फेकलेल्या चेंडूवर फ्लिक मारण्याचा प्रयत्न करत असताना कॅरीने चंडू मिस केला अन् चेंडू थेट पॅडवर आदळला. त्यानंतर विराट, किशन आणि रोहितने मोठी अपिल केली. पण अंपायरचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर किशन, रोहित आणि विराटने या चेंडूवर रिव्यूव घेण्याचा विचार केला. त्यावेळी त्यांनी कुलदीपकडे पाहिलं. खरंतर डीआरएसचा कॉल घेण्याचा कॉल गोलंदाजाचा होता.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
What happen if color is applied on the uniform of a policeman?
होळीच्या बंदोबस्तावेळी पोलिसांच्या वर्दीला रंग लागला तर काय? आपण पोलिसांना रंग लावू शकतो का? जाणून घ्या

नक्की वाचा – ODI World Cup 2023: भारतातील ‘या’ १२ शहरांमध्ये होणार विश्वचषकाचे सामने, या मैदानात रंगणार फायनलचा थरार

इथे पाहा व्हिडीओ

पण कुलदीपने या तिघांनाही डीआरएस घेण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही आणि तो रनअपच्या दिशनं मागे गेला. चेंडूच्या लाईनबाबत साशंकता असल्याने रिव्यू घेण्याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी गोलंदाज अजित आगरकर यांनाही रिव्यूबाबत शंका वाटली.

पण स्क्रीनवर रिप्याल दाखवल्यानंतर चेंडू लेग स्टंपला सोडून बाहेरच्या दिशेनं जात असल्याचं दिसत होतं. त्यामुळं भारताला त्या चेंडूवर कॅरीचा विकेट मिळू शकला नसता. जरी भारताने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला असता, तरी भारताचा एक रिव्यू कमी झाला नसता. कारण त्या चेंडूवर अंपायर कॉल्स देण्यात आला होता. दरम्यान, कुलदीपने त्याचा फिरकीचा भेदक मारा सुरुच ठेवला आणि मार्नस लॅबुशनेला बाद केलं. कुलदीपच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात लॅबुशेन २८ धावांवर झेलबाद झाला.