बोगोटा (कोलंबिया) : भारताची ऑलिम्पिक पदकविजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने मनगटाच्या दुखापतीवर मात करत बुधवारी जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. मीराबाईने एकूण २०० किलोचे वजन उचलले. जागतिक स्पर्धेत सहभागी होताना मीराबाईचे मनगट दुखावले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत मीराबाईने स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली. टोक्यो ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या मीराबाईने ४९ किलो वजनी गटात सहभाग नोंदवला. तिने स्नॅचमध्ये ८७ किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात ११३ किलो असे एकूण २०० किलो वजन उचलत रौप्यकमाई केली. चीनच्या जिआंग हुईहुआने २०६ किलो (९३ व ११३) वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. चीनच्याच होऊ झीहुआने १९८ किलो (८९ व १०९ किलो) कांस्यपदक जिंकले.

‘‘आम्हाला या स्पर्धेचे दडपण नव्हते. इतके वजन मीराबाई कायम उचलते. आता आगामी स्पर्धामध्ये आम्ही अधिक वजन उचलण्यास सुरुवात करू,’’ असे भारताचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी सांगितले. मीराबाईने २०१७च्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. यंदा तिच्याकडून सोनेरी कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात सरावादरम्यान मीराबाईचे मनगट दुखावले. याच दुखापतीसह ती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली होती.

CSK vs KKR Highlights Cricket Score in Marathi
IPL 2024 CSK vs KKR Highlights: ऋतुराजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसकेचा शानदार विजय, केकेआरवर ७ विकेट्सनी केली मात
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद
IPL 2024 Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024 LSG vs PBKS: लखनऊ संघाने मिळवला यंदाच्या हंगामातील पहिला विजय; पदार्पणवीर मयंक यादव ठरला विजयाचा नायक
  • जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाईचे हे दुसरे पदक ठरले. यापूर्वी २०१७ मध्ये अ‍ॅनाहाइम, अमेरिका येथे झालेल्या स्पर्धेत मीराबाईने सुवर्णपदक पटकावले होते.