वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवॉलने टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावत इतिहास रचला आहे. यूएसएमध्ये सुरू असलेल्या अटलांटा ओपन टी-२० क्रिकेट स्पर्धेत रहकीमने ही कामगिरी केली. २९ वर्षीय रहकीमने स्वायर ड्राईव्ह संघाविरुद्ध खेळताना ७७ चेंडून १७ चौकार आणि २२ षटकारांच्या मदतीने नाबाद २०५ धावा काढल्या. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत त्याने आपले द्विशतक पूर्ण केले.

हेही वाचा – भारताच्या तीन खेळाडूंना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकने, जाणून घ्या

तीन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध टी-२० सामन्यातून रहकीम कॉर्नवॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याच्या लठ्ठपणावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. कॉर्नवॉल हा फलंदाजीबरोबरच ऑफ स्पीनर सुद्धा आहे. कॅरेबियन प्रिमीयर लीगमधील धडाकेबाज प्रदर्शनानंतर त्याला वेस्टइंडिज संघात स्थान देण्यात आले होते.

हेही वाचा – “बोलताही येत नव्हतं.. विराट कोहलीने सांगितला पॅरिसमधील सर्वात वाईट अनुभव; म्हणाला, “एक वाईट स्वप्न”..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अटलांटा ओपन टी-२० क्रिकेट स्पर्धेत स्वायर ड्राईव्हविरुद्ध झालेल्या सामन्यात अटलांटा फायरने १७२ धावांनी विजय मिळवला. अटलांटा फायरने २० षटकांत ३२६ धावांचे लक्ष ठेवले होते. कॉर्नवॉल व्यतिरिक्त स्टीवन टेलरने १८ चेंडूत पाच षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली. तर ३२७ धावांचा पाठलाग करणाऱ्या स्वायर ड्राईव्ह संघाला २० षटकांत ८ बाद १५४ धावांपर्यंतच मजल मारता आली. स्वायर ड्राईव्हकडून यशवंत बालाजीने ३८ तर वरुण साईने ३६ धावा केल्या.