IPL will be held twice a year: इंडियन प्रीमियर लीगबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) वर्षातून दोनदा ही लीग आयोजित करण्याची योजना आखत आहे. सध्या या लीगचा १७वा हंगाम २२ मार्चपासून खेळवला जाणार आहे. आयपीएल २०२४ ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे.

विशेष म्हणजे याआधी टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही एका वर्षातील दोन आयपीएलबद्दल एक वक्तव्य केले होते. एका वर्षात दोन आयपीएलबद्दल रवी शास्त्री पहिल्यांदाच बोलले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या लीगची लोकप्रियता लक्षात घेता एका वर्षात लवकरच दोन आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते, असे ते म्हणाले होते. पण आता आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ काय नक्की काय म्हणाले आहेत? जाणून घेऊयात.

Bank Holiday in May 2024 in Marath
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी
Central Bureau of Investigation Bharti various vacant posts of Consultants job location is Mumbai
CBI Bharti 2024 : सल्लागार पदासाठी सीबीआयमध्ये पदभरती; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
Sainik School Satara Bharti 2024
Sainik School Satara Bharti : सैनिक स्कूल सातारामध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळेल ३८ हजार रुपयांपर्यंत पगार

बीसीसीआय एका वर्षात दोन आयपीएलसाठी विंडो शोधत आहे?

बीसीसीआयसमोर योग्य विंडो शोधणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. वास्तविक, वर्षभरात दोन आयपीएल तेव्हाच शक्य होतील जेव्हा, ज्या वर्षी आयसीसी कोणतीही स्पर्धा नसेल किंवा अनेक द्विपक्षीय मालिका आयोजित केल्या जाणार नसतील.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 Final : विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गारद; मुंबई रणजी विजयाच्या जवळ

आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ काय म्हणाले?

टेलिग्राफशी बोलताना आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ म्हणाले, “पाच वर्षांच्या (२०२३-२०२७) सायकलसाठी आयपीएल मीडिया अधिकारांमध्ये, आम्ही पहिल्या दोन हंगामात ७४ सामन्यांची योजना आखत आहोत, नंतर पुढील दोन हंगामात हळूहळू ८४ पर्यंत जाऊ आणि जर आम्हाला अशा प्रकारची विंडो मिळाली तर आम्ही ९४ सामन्यापर्यंत पोहोचू. मात्र, या क्षणी, येत्या चार वर्षांसाठी आमच्याकडे ज्या प्रकारची द्विपक्षीय व्यवस्था आहे, आम्हाला ८४ आणि नंतर ९४ सामन्यांसाठी एक विंडो शोधण्याची गरज आहे.”

अरुण धुमाळ पुढे म्हणाले, “यंदाचा हंगामा द्विपक्षीय मालिका आणि दरवर्षी होणाऱ्या आयसीसी कार्यक्रमांनी इतका भरलेला आहे की वेळ काढणे कठीण आहे. पण, जर एखादी विंडो उपलब्ध असेल आणि जर आपण काहीतरी सर्जनशील करू शकलो, जे आपण करत असलेल्या गोष्टींमध्ये मोलाची भर घालत असेल, तर आपण त्याकडे नक्कीच लक्ष देऊ.”

हेही वाचा – IPL 2024 : अंबाती रायुडूला रोहितला चेन्नईत बघायचेय; म्हणाला, ‘हार्दिकसाठी मुंबईचे नेतृत्व करणे सोपे नसेल कारण…’

आयपीएल टी-२० ऐवजी टी-२० फॉरमॅटमध्ये होणार का?

एका वर्षात दोन आयपीएलसाठी विंडो शोधणे बीसीसीआयसाठी सोपे जाणार नाही. होय, हे शक्य आहे की बीसीसीआय दुसऱ्या आयपीएलचे टी-२० ऐवजी टी-२० फॉरमॅटमध्ये आयोजन करू शकते. अशा परिस्थितीत कमी विडोंत सामने होऊ शकतात. मात्र, आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी टी-२० फॉर्मेटबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याची पुष्टी केली आहे. मात्र, भविष्यात कोणताही निर्णय खेळाच्या हिताचा विचार करून घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.