Ranji Trophy 2024 Final, Mumbai Vs Vidarbha : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ४१ वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ४३.५ षटकांत १०५ धावांवर गारद झाला. त्यामुळे मुंबई पहिल्या डावाच्या जोरावर ११९ धावांची आघाडी घेतली. मुंबईकडून धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे आणि तनुष यांनी प्रतेकी ३ विकेट्स घेतल्या.

विदर्भाचा पहिला डाव –

आज विदर्भाने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३१ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि पहिला धक्का अथर्व तायडेच्या रूपाने बसला. धवल कुलकर्णीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अथर्वला २३ धावा करता आल्या. यानंतर शम्स मुलाणीची शानदार गोलंदाजडी पाहायला मिळाली. त्याने आदित्य ठाकरे आणि अक्षय वाडकरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आदित्यला १९ तर ​​अक्षयला पाच धावा करता आल्या. यानंतर हर्ष दुबे (१), यश राठोड (२७) आणि यश ठाकुर (१६) बाद झाला. यानंतर उमेश यादव शेवटच्या विकेट्सच्या रुपाने बाद झाला. त्याला तनुषने बाद केले.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Delhi beat Gujarat by 4 runs Shubman Gill reacts to defeat
DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार
Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Match Highlights in Marathi
IPL 2024 RCB vs SRH : धावांचा महापूर सुफळ संपूर्ण; दिनेश कार्तिकची झुंज व्यर्थ
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा

मुंबईचा पहिला डाव –

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईसाठी सलामीवीर पृथ्वी शॉ आणि भूपेन ललवानी यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार रहाणे आणि श्रेयस अय्यर सात धावा करून बाद झाले. हार्दिक तामोरे पाच आणि शम्स मुलानी १३ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – WPL 2024 : हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावल्याने रिचा घोषला अश्रू अनावर, VIDEO होतोय व्हायरल

अष्टपैलू शार्दुल ठाकूरने झळकावले अर्धशतक –

यानंतर अष्टपैलू शार्दुल ठाकूरने ३७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. शार्दुलने १३१.५८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना हे अर्धशतक पूर्ण केले. तनुष कोटियन आठ धावा करून बाद झाला तर तुषार देशपांडे १४ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे मुंबईचा डाव २२४ धावांवर आटोपला. विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर उमेश यादवने दोन गडी बाद केले. आदित्य ठाकरेने एक विकेट घेतली.