International Cricketers: क्रिकेटच्या इतिहासातअनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना हत्येपासून ते बलात्कारापर्यंतच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले होते. जगभरातील सर्वच क्रिकेट राष्ट्रांमध्ये चाहते खेळाडूंना आपला हिरो मानतात, परंतु काही वेळा काही खेळाडू अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांची मनं तुटतात. असे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत जे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात गेले आहेत.

) संदीप लमाचीने

सध्याच्या ताज्या प्रकरणात नेपाळचा माजी कर्णधार संदीप लमाचीनेला तुरुंगवास भोगावा लागणार आहे. संदीपवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता, त्यामुळे न्यायालयाने त्याला आठ वर्षांची शिक्षा सुनावली.

james anderson farewell match at lord
व्यक्तिवेध : जेम्स अँडरसन
maharashtra assembly approved supplementary demands without discussion
पुरवणी मागण्या चर्चेविना मंजूर
Sunil Gavaskar 75th Birthday Special boundary hero who allowed the Laxman Line to cross
‘लक्ष्मणरेषा’ पार करू देणारा बाउंड्रीवीर…
Rohit sharma on Suryakumar yadav catch in Maharashtra Legislature
VIDEO: “सूर्याच्या हातात कॅच बसला नसता तर त्याला…”, रोहितने दम भरताच आमदारांना हसू आवरेना; पाहा काय घडलं?
Virat recalls 15 years with Rohit
Victory Parade : “मी १५ वर्ष रोहितबरोबर खेळतोय, त्याला इतकं भावुक कधीच पाहिलं नाही…’, विराटकडून हिटमॅनचं कौतुक
Jay Shah said two names shortlisted for Team India coach
“दोन नावं शॉर्टलिस्ट…”, गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या चर्चांदरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाहांचा मोठा खुलासा
They have done a lot for Indian cricket Gautam Gambhir hails Rohit Sharma Virat Kohli after T20I retirement
“…टी-२० कारकीर्दीला पूर्णविराम देण्यापेक्षा आणखी चांगलं काय असू शकतं’; विराट-रोहितच्या निवृत्तीवर गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य
Candice Warner, David Warner
“तुझ्यामुळे आम्हालाही…”, वॉर्नरच्या निवृत्तीनंतर पत्नी कँडिसची भावनिक पोस्ट; विक्रमांची यादी शेअर करत म्हणाली…

) शहादत हुसेन

बांगलादेशसाठी ५० हून अधिक एकदिवसीय सामने खेळलेल्या शहादत हुसेनला बांगलादेशमध्ये फरारी घोषित करण्यात आले. त्याच्यावर ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याचा आरोप होता. ती मुलगी शहादतच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची.

) मोहम्मद आमिरला इंग्लंडमध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर इंग्लंडमध्ये स्पॉट फिक्सिंग करताना आढळला होता. त्यानंतर त्याला अटक झाली आणि तुरुंगात जावे लागले. आमिरबरोबर सलमान बट आणि मोहम्मद आसिफही होते. या घटनेने संपूर्ण पाकिस्ताचे नाव खराब झाले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील केली होती. सध्या हे क्रिकेटपटू शिक्षा भोगून बाहेर आले आहेत तसेच, तिघांनीही काही वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

४) नवज्योतसिंग सिद्धू सिद्ध यांच्यावर हत्येचा आरोप आहे

माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू याच्यावर हत्येचा आरोप आहे. १९८८ मध्ये रागात गाडी चालवत असताना रस्त्यात त्याच्यामुळे अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी सिद्धूला नाममात्र दंड ठोठावण्यात आला आणि त्याला जामीन मिळाला, परंतु पीडित कुटुंबाने हार मानली नाही आणि खटला लढवत ठेवला. त्यानंतर २०२२मध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

५) मानवी तस्करी प्रकरणात जेकब मार्टिन तुरुंगात गेला

भारताकडून १० एकदिवसीय सामने खेळणाऱ्या जेकब मार्टिनला २०११ मध्ये मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. बेकायदेशीरपणे लोकांना इंग्लंडमध्ये पाठवल्याचा आरोप त्याच्यावर होता.

हेही वाचा: IND vs AFG 1st T20: टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली पहिला टी-२० खेळणार नाही, द्रविडचा पत्रकार परिषदेत खुलासा

६) रुबेल हुसैन याच्यावर बलात्काराचा आरोप होता

२०१५ मध्ये, वर्ल्ड कपच्या अगदी आधी, बांगलादेशी गोलंदाज रुबेल हुसेनवर त्याची मैत्रीण असलेल्या एका महिलेने बलात्कार आणि प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला होता. रुबेलने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी संबंध ठेवले आणि वचन मोडल्याचे आरोपात म्हटले आहे. त्यामुळे रुबेलला तुरुंगात जावे लागले.

७) ख्रिस लुईसला १३ वर्षांची शिक्षा झाली

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस लुईस याला २००९ मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी १३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ख्रिस त्याच्या किट बॅगमध्ये ज्यूस बॉक्समध्ये लपवून ड्रग्जची तस्करी करत होता.

८) फिक्सिंगप्रकरणी श्रीसंतला तुरुंगवास भोगावा लागला होता

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला २०१३ मध्ये आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले होते. श्रीसंतबरोबर अजित चंडिला आणि अंकित चव्हाणही अडकले होते. मात्र, नंतर सुप्रीम कोर्टाने श्रीसंतला सर्व आरोपातून दोषमुक्त केले. त्याने देखील सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली आहे.

८) मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, मनोज प्रभाकर आणि हॅन्सी क्रोनिएला मॅच फिक्सिंग प्रकरणी झाली होती शिक्षा

क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मॅच फिक्सिंग घोटाळा २००० मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेदरम्यान उघडकीस आला होता. सामना फिक्स करण्यासाठी दोन्ही संघातील पाच खेळाडू बुकींच्या संपर्कात असल्याचे दिल्ली पोलिसांनी उघड केले. टीम इंडियाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए यांच्यावर आरोप होते. क्रोनिएने सुरुवातीला आरोप फेटाळले, पण नंतर कबूल केले की अझहरने त्याची बुकीशी ओळख करून दिली होती. अझहर आणि अजय जडेजा यांच्यावर नंतर आजीवन बंदी घालण्यात आली होती. क्रोनिएचा २००२ मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. ८ नोव्हेंबर २०१२ रोजी आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्यावरील आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आणि त्यांना निर्दोष मुक्त केले.

) शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नला २००३ मध्ये वादाचा सामना करावा लागला होता जेव्हा त्याच्यावर एका दक्षिण आफ्रिकन महिलेला अश्लील मजकूर संदेश पाठवल्याचा आरोप झाला होता. आरोप सिद्ध झाले नाहीत म्हणून वॉर्नने आपले नाव बदनाम केल्याप्रकरणी बदनामीचा गुन्हा दाखल करत कायदेशीर मदत घेतली. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत, वॉर्न मैदानाबाहेरील महिलांशी संबंधित विवादांसाठी ओळखला जात असे. वयाच्या ६६व्या वर्षी त्याचे निधन झाले.

१०) सुरेश रैना

भारतीय फलंदाज सुरेश रैनाला २०२०मध्ये कोविड-१९ प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईत अटक करण्यात आली होती. कोविड-१९ वर निर्बंध असताना तो गायक गुरु रंधावाबरोबर एका क्लबमध्ये पार्टी करताना आढळला. छापेमारीत अटक करण्यात आलेल्या ३४ जणांमध्ये रैनाचा समावेश होता.

हेही वाचा: IND vs AFG 1st T20: आवेश खानची कविता अन् मोहालीच्या थंडीची राहुल द्रविडने केली बंगळुरूशी तुलना, पाहा मजेशीर Video

११) मखाया एनटिनी

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मखाया एनटिनीला१९९८ मध्ये लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच्यावर पूर्व लंडनमधील एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता, परंतु न्यायालय त्याला दोषी सिद्ध करू शकले नाही आणि तुरुंगात अल्प कालावधीनंतर त्याची सुटका झाली. एनटिनीने कसोटीत ३०९ आणि एकदिवसीय सामन्यात २६६ विकेट्स घेत यशस्वी क्रिकेट कारकीर्द केली.

१२) विनोद कांबळी

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीला २०१५ मध्ये त्यांच्या पत्नीसह त्यांच्या मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पगार मागितला असता कांबळी आणि त्याच्या पत्नीने तिला शिवीगाळ केली आणि खोलीत कोंडून ठेवले, अशी तक्रार मोलकरणीने दाखल केली होती. कांबळीने हे आरोप फेटाळले आणि दावा केला की तिच्याकडे योग्य ओळखीचा पुरावा नव्हता. त्यामुळे तो सध्या जामिनावर बाहेर आहे.

१३) वसीम अक्रम

१९९३ मध्ये, वकार युनूस, आकिब जावेद आणि मुश्ताक अहमद यांच्यासह वसीम अक्रम याला बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर अटक करण्यात आली होती, जे नंतर गांजा नसल्याचे आढळून आले. त्यांची जामिनावर सुटका झाली आणि खटल्याचा निकाल अनिश्चित काळासाठी तसाच पडून होता. त्यानंतर त्यांना निर्दोष मुक्त केले.

१४) अमित मिश्रा

भारताचा माजी लेगस्पिनर अमित मिश्रा याला बंगळुरू पोलिसांनी हॉटेलच्या खोलीत एका महिलेला मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि ३२८ अंतर्गत हल्ला करणे आणि दुखापत करणे या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

१५) इम्रान खान

माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या सत्तेच्या काळात महागड्या सरकारी भेटवस्तू विकून नफा मिळवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती आणि पाच वर्षे सक्रिय राजकारणात भाग घेण्यास बंदी घातली. पाकिस्तान तहरीक-ए इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांना त्यांच्या लाहोर येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली आणि नंतर त्यांची इस्लामाबादला रवानगी करण्यात आली. शांततापूर्ण निषेध करणे हा प्रत्येक पाकिस्तानचा घटनात्मक अधिकार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

१६) सचित्र सेनानायके

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायकेला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला परदेशात जाण्यास बंदी घातली होती. सेनानायकेवर लंका प्रीमियर लीग २०२० मधील सामने फिक्स केल्याचा आरोप आहे ज्यामध्ये त्याने दोन खेळाडूंना सामने फिक्स करण्यासाठी प्रवृत्त केले होते.

१७) दानुष्का गुणतिलका

नुकतेच श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुणतिलका याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाले होते. मात्र, आता दानुष्का गुणतिलका याला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, दानुष्का गुणतिलका याला क्लीन चीट मिळाली आहे. या खेळाडूवरील बलात्काराचे आरोप खोटे निघाले. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स न्यायालयाने श्रीलंकन क्रिकेटपटूला निर्दोष घोषित केले आहे.

१८) सी.एम. गौतम आणि बहारार काझी

बेल्लारी संघाचा कर्णधार सी.एम. गौतम आणि बहारार काझी यांना पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक केली होती. सी.एम. गौतम आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. केपीएल २०१९ फायनलमध्ये संथ फलंदाजीसाठी दोन्ही खेळाडूंना बुकींनी २० लाख रुपये दिले होते. कर्नाटक प्रीमियर (KPL २०१९) लीगचा अंतिम सामना हुबळी आणि बेल्लारी संघामध्ये खेळला गेला होता, त्यादरम्यान ही घटना घडली होती.

१९) ल्यूक पोमर्सबॅक

ऑस्ट्रेलियाच्या ल्यूक पोमर्सबॅकला ९ ऑगस्ट २००९ रोजी दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. दारू पिऊन त्याने एका अधिकाऱ्यावर हल्ला केला. यानंतर तो कायदेशीर कोठडीतून फरार झाला. नंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. शिक्षा म्हणून, पॉमर्सबॅकचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द करण्यात आले. त्याला दंडही ठोठावण्यात आला. यानंतर मे २०१२ मध्ये पॉमर्सबॅकवर भारतीय हॉटेलमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होता. त्याने त्याच्या लग्न ठरलेल्या मुलीवरही हल्ला केला. या कारणावरून त्याला अटक करण्यात आली. नंतर प्रकरण न्यायालयाबाहेर हे प्रकरण निकाली निघाल्याने त्याच्यावरील सर्व आरोप वगळण्यात आले.

२०) बेन स्टोक्स

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स एका वादात सापडला होता. २०१७ मध्ये, त्याला नाईट क्लबबाहेर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर स्टोक्सला रात्रभर तुरुंगात जावे लागले. अॅलेक्स हेल्सही स्टोक्सबरोबर तुरुंगात होता. या अष्टपैलू खेळाडूला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आले होते. यापूर्वी २०१२ मध्ये स्टोक्सला अशाच एका घटनेत अटक करण्यात आली होती. दोघांनाही या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.