scorecardresearch

सानिया मिर्झा-शोएब मलिकचा घटस्फोट निश्चित, फक्त ‘या’ कारणामुळे अधिकृत घोषणा बाकी

सानिया मिर्झा-शोएब मलिकचं घटस्फोटांच्या चर्चांवर मौन कायम; कारण..

सानिया मिर्झा-शोएब मलिकचा घटस्फोट निश्चित, फक्त ‘या’ कारणामुळे अधिकृत घोषणा बाकी
(फोटो – शोएब मलिकच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक या जोडप्याच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आहे, असा दावा शोएबच्या एका जवळच्या व्यक्तीने केला होता. परंतु शोएब-सानियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी ‘द मिर्झा मलिक शो’ची घोषणा केली, तसेच सानियाच्या वाढदिवसाला शोएबने ट्वीट करून शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं गेलं. पण अलीकडच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांच्याही घटस्फोटाच्या चर्चा या अफवा नाहीत, कारण सानिया आणि शोएबच्या नात्यात सर्वकाही आलबेल नाही.

टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सानिया आणि शोएबच्या नात्यात दुरावा आलाय, हे खरं आहे. तसेच दोघेही लवकरच घटस्फोट घेतील. पण त्यांनी ‘द मिर्झा मलिक शो’ आधीच एकत्र साईन केला होता. त्यामुळे हा शो संपेपर्यंत ते यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत. त्यांनी आताच घटस्फोटावर शिक्कामोर्तब केल्यास ते कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकतात, त्यामुळे दोघांनी मौन बाळगलंय. हा शो संपल्यावरच ते त्यांच्या घटस्फोटाबद्दल अधिकृत प्रतिक्रिया देतील, असं म्हटलं जातंय.

Sania Mirza Birthday: घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकचं सानिया मिर्झासाठी ट्वीट, म्हणाला…

दरम्यान, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा आगामी कार्यक्रम ‘द मिर्झा मलिक शो’ ‘उर्दूफ्लिक्स’वर प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून सानिया आणि शोएब पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करता दिसणार आहेत. मार्च महिन्यात शोएबने या कार्यक्रमाची घोषणा केली होती.

सानिया आणि शोएब यांचा प्रेमविवाह झाला होता. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघेही १२ एप्रिल २०१० रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्या दोघांनी हैदराबादमध्ये लग्न केलं होतं. नंतर पाकिस्तानमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. सानिया मिर्झा हिने २०१८ मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव इझान असे आहे. सध्या सानिया ही ३५ वर्षांची असून शोएब मलिक हा ४० वर्षांचा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 13:11 IST

संबंधित बातम्या