लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत जागतिक टेनिस क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या दुसऱ्या मानांकित रॉजर फेडररने तिसऱ्या मानांकित स्पेनच्या राफेल नदालला ७-६(३), १-६, ६-३,६-४ असे पराभूत केले. फेडरर आणि नदालमध्ये पहिल्याच सेटमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र फेडररने हा सेट १ गुणाच्या फरकाने जिंकला आणि नंतरच्या तीनही सेटमध्ये आघाडी कायम ठेवली.

त्यामुळे रॉजर फेडररने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत विजय मिळवला. अंतिम सामन्यात आता त्याची लढत अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच सोबत होणार आहे.

 

फेडरर आणि नदाल यापूर्वी २००८ मध्ये अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यानंतर प्रथमच विम्बल्डनमध्ये हे दोघे आमनेसामने येणार असल्यामुळे या सामन्याला फार महत्त्व प्राप्त झाले होते. २००८ मध्ये चार तास आणि ४८ मिनिटे रंगलेल्या त्या अंतिम लढतीत नदालने फेडररला ६-४, ६-४, ६-७ (५-७), ६-७ (८-१०), ९-७ असे पाच सेटमध्ये नमवले होते. या सामन्यापूर्वी फेडररने सलग दोन वेळा विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले होते.