यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच याने २३ व्या मानांकित रॉबेर्टो ब्युटिस्टा अगुट याला ६-२, ४-६, ६-३, ६-२ असे पराभूत केले आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जोकोव्हिचने पहिला सेट ६-२ असा अत्यंत शिताफीने जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये रॉबेर्टोने दमदार पुनरागमन केले. त्याने तो सेट ४-६ असा खिशात घातला. त्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. पण जोकोव्हिजन अनुभवाच्या जोरावर पुढील दोनही सेट जिंकून सामन्यात विजय मिळवला.
Wimbledon 2019: Novak Djokovic beats Roberto Bautista Agut to enter final pic.twitter.com/Gs8c0c6nqx
— ANI (@ANI) July 12, 2019
अंतिम सामन्यात जोकोव्हिचची झुंज राफेल नदाल किंवा रॉजर फेडरर यांच्यात होणार आहे. फेडरर आणि नदाल यांच्यात बरेच वर्षांनी सामना होणार आहे.फेडरर आणि नदाल यापूर्वी २००८ मध्ये अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यानंतर प्रथमच विम्बल्डनमध्ये हे दोघे आमनेसामने येणार असल्यामुळे या सामन्याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. विम्बल्डनच्या अधिकृत ट्विटर संकेतस्थळानेसुद्धा २००८ मधील या दोन्ही खेळाडूंचा चषकासह छायाचित्र टाकून जुन्या आठवणींना उजाळा दिला. २००८ मध्ये चार तास आणि ४८ मिनिटे रंगलेल्या त्या अंतिम लढतीत नदालने फेडररला ६-४, ६-४, ६-७ (५-७), ६-७ (८-१०), ९-७ असे पाच सेटमध्ये नमवले होते. या सामन्यापूर्वी फेडररने सलग दोन वेळा विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले होते.
