Wimbledon 2023: विम्बल्डनचा अंतिम सामना नोव्हाक जोकोव्हिच आणि कार्लोस अल्कराझ यांच्यात झाला. जोकोव्हिच हा सामना जिंकण्यासाठी फेव्हरिट मानला जात होता. पण त्याला कार्लोस अल्कराझकडून एका रोमांचक सामन्यात पराभूत करून पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. जोकोव्हिचचा अल्कराझने १-६,७-६,६-१,३-६,६-४ असा पराभव केला. त्याचवेळी या फायनलमध्ये एक विचित्र घटनाही पाहायला मिळाली. सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने रागाच्या भरात असे कृत्य केले, जे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. सामन्यादरम्यान जोकोव्हिचला समोर पराभव दिसत होता त्यामुळे त्याने त्याची रॅकेट नेटच्या खांबावर आपटून तोडली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जोकोव्हिचने रागाच्या भरात त्याचे रॅकेट तोडले

१-२ अशा पिछाडीवरून पुनरागमन करताना नोव्हाकने हा सामना पाचव्या सेटमध्ये नेला. पाचव्या सेटमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान नोव्हाकचा पारा खूप चढला होता. नोव्हाक जोकोव्हिचने पाचवा सेट गमावल्यानंतर रागाच्या भरात त्याने त्याचे रॅकेट तोडले, ज्यामुळे त्याच्या रॅकेटचा मधला भाग दुभंगला आणि त्याचा आकारच बदलला. यासाठी अंपायरने त्याला नियमानुसार ताकीदही दिली. त्याचे रॅकेट फोडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दुसरीकडे, २० वर्षीय कार्लोस शांतपणे खेळला अन् दिग्गज खेळाडूला नमवून पहिले विम्बल्डन जेतेपद नावावर केले. विम्बल्डन जिंकणारा तो तिसरा स्पॅनिश खेळाडू ठरला. राफेल नदालने २००८ व २०१० मध्ये तर मॅन्यूएल सँटानाने १९६६ मध्ये विम्बल्डन जिंकली होती.

२४वे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी जोकोव्हिचला वाट पाहावी लागणार आहे

३६ वर्षीय नोव्हाक जोकोव्हिचला २४वे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. जोकोव्हिचने जर फायनल जिंकली असती तर त्याचे हे सलग पाचवे विम्बल्डन विजेतेपद ठरले असते. पण स्पेनचा युवा खेळाडू कार्लोस अल्कराझने शानदार खेळी करत त्याचा विजयी रथ रोखला.

हेही वाचा: Wimbledon 2023: “माझ्या जन्मापूर्वी तू…”, १६ वर्षांनी लहान अल्कराझने वयाचा उल्लेख करताच जोकोव्हिचला हसू अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंतिम सामना पाहण्यासाठी राजेशाही कुटुंब आले होते

नोव्हाक जोकोव्हिच आणि कार्लोस अल्कराझ यांच्यातील विम्बल्डन फायनल पाहण्यासाठी राजघराणे आले होते. प्रिन्सेस डायना, केट मिडलटन आणि प्रिन्स विल्यम तसेच त्यांची दोन मुले प्रिन्सेस शार्लोट आणि प्रिन्स जॉर्ज तेथे होते. राजघराण्यातील काही अप्रतिम छायाचित्रेही कोर्टमधून व्हायरल होत आहेत. प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस शार्लोट या खेळाचा पुरेपूर आनंद घेत होते. मात्र, अल्कराझने अंतिम फेरीत टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या जोकोव्हिचला पराभूत करून शानदार कामगिरी केली. या पराक्रमासाठी तो कायम स्मरणात राहील.