सिडनी : इंग्लंडने बुधवारी यजमान ऑस्ट्रेलियाला ३-१ अशा फरकाने नमवत महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर स्पेनचे आव्हान असणार आहे.

ऑस्ट्रेलियाची तारांकित खेळाडू सॅम करने स्पर्धेत प्रथमच सुरुवातीच्या अकरा खेळाडूंमध्ये सहभागी होती. तिने ऑस्ट्रेलियन संघासाठी एकमेव गोलही केला. मात्र, युरोपिय विजेता इंग्लंडला नमवण्यासाठी हा गोल पुरेसा नव्हता. सामन्याच्या पहिल्या सत्रात इंग्लंडचे पूर्णपणे वर्चस्व राहिले. इंग्लंडच्या एला टूनने (३६व्या मिनिटाला) ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीला भेदत १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बरोबरी साधण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे प्रयत्न सुरू झाले. पण, इंग्लंडच्या बचावपटूंनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे मध्यांतरापर्यंत संघाकडे १-० अशी आघाडी होती.

Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद

दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन संघाने आक्रमक सुरुवात केली आणि त्याचा फायदाही संघाला झाला. करने (६३व्या मि.) गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. या गोलनंतर स्टेडियममध्ये उपस्थित ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, त्यांना या गोलचा आनंद फार काळ घेता आला नाही. इंग्लंडच्या लॉरेन हेम्पने (७१व्या मि.) ऑस्ट्रेलियाच्या गोलरक्षकाला चकवत गोल केला व इंग्लंडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर अॅलेसिया रूसोने (८६व्या मि.) गोल झळकावत संघाला ३-१ असे मजबूत स्थितीत पोहोचवले. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले. पण, इंग्लंडच्या बचावपटूंनी त्यांना कोणतीच संधी दिली नाही आणि अखेपर्यंत आघाडी कायम राखताना विजय नोंदवला. स्पेन व इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना रविवारी पार पडेल.