scorecardresearch

महिला टी-२० चॅलेंज : महाराष्ट्राची माया सोनवणे तळपली, गोलंदाजी ठरतेय चर्चेचा विषय; पाहा व्हिडीओ

व्हेलॉसिटी संघाकडून खेळताना माया सोनवणे या खेळाडूने एकूण दोन षटके टाकली.

maya sonwane
माया सोनवणे (फोटो- iplt20.com)

एकीकडे आयपीएल २०२२ चे प्लेऑफचे सामने आजपासून खेळवले जात आहेत. तर दुसरीकडे पुण्यात महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचा थरार रंगला आहे. आज सुपरनोव्हाज आणि व्हेलॉसिटी या दोन संघामध्ये टी-२० चॅलेंजमधील दुसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात व्हेलॉसिटी संघाचा सात गडी राखून विजय झाला. तसेच या संघात मूळची महाराष्ट्राची असलेली फिरकीपटू माया सोनवणे चांगली चमकली. या महिला खेळाडूची गोलंदाजी करण्याची पद्धत चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा >> ‘गरज पडल्यास केव्हाही फोन कर’, रोहित शर्माने ‘या’ खेळाडूला दिलं मदतीचं आश्वासन

या सामन्यात व्हेलॉसिटी संघाकडून खेळताना माया सोनवणे या खेळाडूने एकूण दोन षटके टाकली. मात्र मायाची चेंडू टाकण्याची पद्धत अनेकांना आवडली आहे. चेंडू टाकताना माया पूर्ण खाली वाकते. तसेच चेंडू टाकताना तिचे लक्ष फलंदाजाकडे नसते. मायाच्या याच खास शैलीमुळे सगळेच प्रभावित झाले आहेत. मायाने या सामन्यात दोन षटके टाकली. मात्र तिला बळी घेता आले नाही. मात्र तिच्या अनोख्या गोलंदाजीची अनेकांनी प्रशंसा केली आहे.

हेही वाचा >> खुशखबर! २०२३च्या आयपीएल पर्वात बंगळुरुचं बळ वाढणार; एबी डिव्हिलियर्स पुन्हा येणार

दरम्यान, सुपरनोव्हाज आणि व्हेलॉसिटी यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात व्हेलॉसिटी संघाने नाणेफेक किंजून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुपरनोव्हाज संघाने वीस षटकांत १५० धावा केल्या. तर व्हेलॉसिटी संघाने ही धावसंख्या १९ व्या षटकात गाठत सामन्यावर आपले नाव कोरले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Womens t20 challenge velocity team players maya sonawane action of bowling went viral prd