Women’s T20 World Cup 2023 Semifinal: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. न्यूलँड्स येथील केप टाउन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात निर्धारित २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाकडून बेथ मूनीने सर्वाधिक ५४ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर मेग लॅनिंग नाबाद ४९ धावांचे योगदान दिले. तसेच भारतासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर अलिसा हिली आणि बेथ मूनीने पहिल्या विकेटसाठी ७.३ षटकांत ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अलिसा हिलीच्या रुपाने ऑस्ट्रेलिया संघाला पहिला धक्का बसला. अलिसा हिलीने २५ धावांचे योगदान दिले.

मुनीने ३७चेंडूत ५४ धावांची खेळी केली. लॅनिंगने ३४ चेंडूत ४९धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी ऍशले गार्डनरने १८ चेंडूत ३१धावा केल्या. भारताकडून शिखा पांडेने दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

भारत आणि ऑस्ट्रेलियाची आकडेवारी –

टीम इंडियाने महिला क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये फक्त सात जिंकले आहेत. आणि ऑस्ट्रेलियाने २२ सामन्यांत विजय मिळवला. भारताचा ऑस्ट्रेलियावर शेवटचा विजय गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मिळवला होता, जेव्हा त्यांनी सुपर ओपरमध्ये बाजी मारली होती.

हेहीा वाचा – Gautam Gambhir: ‘मला नाव सांगा, अशा खेळाडूचे ज्याने…’, गौतम गंभीरचे राहुलच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): अ‍ॅलिसा हिली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅशले गार्डनर, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेरेहम, जेस जोनासेन, मेगन शट, डार्सी ब्राउन