आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीत भारताचा बॉक्सिंगपटू शिवा थापा याने ५६ किलो वजनी गटात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. गेल्या महिन्यात दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत शिवाने कांस्यपदक पटकावले होते. त्यामुळेच त्याने १५५० गुणांसह पाच स्थानांची भरारी घेतली. आर्यलडचा मिचेल कोनलॅन (२१५० गुण) अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याने जागतिक स्पध्रेत सुवर्णपदक जिंकले होते.
विजेंदर सिंग (२००९, कांस्य) आणि विकास कृष्णन (२०११, कांस्य) यांच्यानंतर जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत पदक जिंकणारा शिवा तिसरा भारतीय खेळाडू आहे. दोहा येथील स्पध्रेत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेला विकास ७५ किलो मिडलवेट विभागात सहाव्या स्थानावर आहे. सुपर हेव्हीवेट गटात (९१ किलोवरील) सतीश कुमार सातव्या स्थानी, तर ४९ किलो वजनी गटात एल. देवेंद्रो १३व्या स्थानी आहे. त्यानंतर आशियाई स्पध्रेतील सुवर्णपदक विजेता सुमीत सांगवान ८१ किलो वजनी गटात १८व्या, तर ६४ किलो वजनी गटात मनोज कुमार १८व्या स्थानावर आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2015 रोजी प्रकाशित
जागतिक बॉक्सिंग क्रमवारी : शिवा थापा दुसऱ्या स्थानावर
जागतिक क्रमवारीत भारताचा बॉक्सिंगपटू शिवा थापा याने ५६ किलो वजनी गटात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली
Written by पीटीआयझियाउद्दीन सय्यद

First published on: 04-11-2015 at 03:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World championship bonze winner shiva thapa second in aiba rankings