World Cup 2019 : इंग्लंडमध्ये ३० मे पासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ कसून सराव करत आहेत. भारताच्या संघातील खेळाडूही यात कुठे कमी नाहीत. भारताच्या संघात असलेल्या लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या या दोघांनी तंदुरुस्त राहण्याच्या दृष्टीने जिम मध्ये व्यायाम करत असतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकेश राहुल हा गेल्या काही एकदिवसीय सामन्यात सातत्याने अपयशी ठरला. हार्दिक पांड्या दुखापतीनंतर संघात आला आणि त्याने समाधानकारक कामगिरी केली. पण हे दोघे कॉफी विथ करण या शो तील मुलाखतीनंतर जास्त चर्चेत आले. त्यांनी केलेली काही विधाने ही आक्षेपार्ह असून त्यामुळे त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली. पण निवड समितीने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना संघात स्थान दिले आहे. त्यानंतर आता हे दोघे जिममध्ये घाम गाळत आहेत.

World Cup 2019 या स्पर्धेसाठी १५ एप्रिलला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. BCCI च्या मुंबई येथील मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर अंतिम संघाची घोषणा करण्यात आली. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली जात होतीच. पण या बैठकीत संघातील इतर चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यानंतर लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2019 watch hardcore workout of hardik pandya kl rahul in gym
First published on: 21-05-2019 at 11:21 IST