ICC World Cup 2023: आता विश्वचषक सुरू होण्यासाठी १५ दिवस बाकी आहेत. या स्पर्धेला भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वेळी अंतिम फेरीत पराभूत झालेला केन विल्यमसनच्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू टीम साऊदी विश्वचषकातून बाहेर होऊ शकतो. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशा स्थितीत तो काही दिवस क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात होणाऱ्या विश्वचषकात टीम साऊदीच्या खेळण्याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार आहे. साऊदीला गेल्या आठवड्यात इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात झेल घेण्याच्या प्रयत्नात उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांना आशा आहे की, ३४ वर्षीय गोलंदाज ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी बरा होईल.

हेही वाचा: Team India: Adidasने वर्ल्डकप २०२३साठी केली नवी जर्सी लाँच, ‘या’ स्वरुपात दिसणार तिरंगा; रोहित-विराटचा Video व्हायरल

काय म्हणाले न्यूझीलंडचे प्रशिक्षक?

स्टेड म्हणाले, “आम्ही ठरवले की साऊदीवर शस्त्रक्रिया करणे हे योग्य ठरेल. त्याच्या उजव्या अंगठ्यामध्ये पिन किंवा स्क्रू ठेवल्या जातील आणि जर ही प्रक्रिया यशस्वी झाली, तर तो संघात लवकर परताना दिसू शकतो. त्याला आता खूप वेदना होत आहेत पण तो सहन करू शकेल याची आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल.” सध्याच्या चॅम्पियन इंग्लंडविरुद्ध विश्वचषकातील सलामीच्या सामन्यापूर्वी, न्यूझीलंड संघ २९ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.

स्टेड म्हणाले, “विश्वचषकातील आमचा पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध आहे आणि आम्ही त्याच्या संघातील पुनरागमनवर लक्ष्य केंद्रित केले आहे. जर तो पूर्णपणे तंदुरस्त होऊ शकला नाही तर संघात बदल करू. यानंतर कोणत्याही प्रकारच्या बदलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) मान्यता घ्यावी लागेल. आम्ही सावधगिरीचा उपाय म्हणून पर्यायी गोलंदाज शोधला आहे.”

हेही वाचा: ICC Ranking: नंबर १ मोहम्मद सिराज! आशिया कपमधील कामगिरीचे मिळाले बक्षिस, शुबमनचेही होणार प्रमोशन

न्यूझीलंडचा संघ बांगलादेशमध्ये आहे

विश्वचषकासाठी निवडलेल्या न्यूझीलंड संघाचे पाच खेळाडू सध्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी होणार आहे. न्यूझीलंडचे इतर खेळाडू मंगळवारी भारतात रवाना होतील. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्णपणे तंदुरस्त झाला आहे. त्यामुळे संघाला दिलासा मिळाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2023 new zealands tension increase before the world cup tim southee will have to undergo surgery avw
First published on: 20-09-2023 at 18:58 IST