संदीप कदम

कोलकाता : सलग सात विजय नोंदवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करणाऱ्या भारतीय संघाचा एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, रविवारी लयीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. यावेळी भारताचे लक्ष्य गुणतालिकेतील आपले अग्रस्थान आणखी भक्कम करण्याचे राहील. त्यातच आज भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीचा वाढदिवस असल्याने तो सचिनच्या ४९ शतकांच्या विक्रमाची बरोबरी करतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा
Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत चमक दाखवताना आतापर्यंत खेळलेल्या सातही सामन्यांत निर्भेळ यश संपादन केले. सर्वच आघाडय़ांवर संघातील खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे भारत या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हीच लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. भारताचे फलंदाज असो की गोलंदाज त्यांनी आपली छाप पाडली आहे. गेल्या सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारताने उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली. भारत १४ गुणांसह अग्रस्थानी असून दक्षिण आफ्रिका १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, भारताच्या (२.१०२) तुलनेत आफ्रिकेची (२.२९०) निव्वळ धावगती चांगली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून अग्रस्थानी पोहोचण्याची आफ्रिकेला संधी आहे.

हेही वाचा >>>NZ vs PAK: न्यूझीलंड ठरला विश्वचषकाच्या ४८ वर्षांच्या इतिहासातील सर्वात कमनशिबी संघ, प्रथमच ४०० धावा करूनही पत्करावा लागला पराभव

सामन्याच्या दिवशीच विराटचा वाढदिवस असल्याने हा सामना त्याच्यासाठी ‘विशेष’ असेल. गेल्या काही सामन्यांपासून विराटला शतकाने हुलकावणी दिली आहे. मात्र, या सामन्यात तो शतकाची उणीव भरून काढेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार असून हे रोहितचे आवडते मैदान आहे. त्याने अनेक संस्मरणीत शतकी खेळी या मैदानावर केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तो चमक दाखवण्यास उत्सुक असणार आहे.

भारत

’रोहित शर्मा व शुभमन गिल यांच्यावर संघाला आक्रमक सुरुवात देण्याची जबाबदारी असेल. त्यासह विराट कोहली व श्रेयस अय्यरही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करतील.

’वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमरा या लयीत असलेल्या त्रिकुटावर असेल. शमीने गेल्या तीन सामन्यांत मिळून १४ बळी मिळवले आहेत.

हेही वाचा >>>AUS vs ENG: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ! कांगारुंचा इंग्लंडवर ३३ धावांनी रोमहर्षक विजय

दक्षिण आफ्रिका 

’ सलामीवीर क्विंटन डिकॉकला रोखण्याचे आव्हान भारतासमोर असेल. हेन्रिक क्लासन, रासी व्हॅन डर डसन, एडीन मार्करम व डेव्हिड मिलर हे सर्वच फलंदाज लयीत आहेत.

’आफ्रिकेकडे मार्को यान्सन, जेराल्ड कोएट्झी, अनुभवी कगिसो रबाडा आणि लुन्गी एन्गिडी असा चांगला वेगवान मारा आहे.

’ वेळ : दुपारी २ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,२, १ हिंदी, हॉटस्टार अ‍ॅप