या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखेरच्या दिवशी दोन सुवर्णपदकांची कमाई

भारतीय नेमबाजांनी घरच्या मैदानावर रंगलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी सादर के ली. अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदकांची भर घालत पदकतालिके त अग्रस्थान कायम राखले. त्याचबरोबर भारताच्या १५ नेमबाजांनी आतापर्यंत टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित के ले.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या यजमान भारताने एकू ण ३० पदकांची कमाई के ली. त्यात १५ सुवर्ण, ९ रौप्य आणि ६ कांस्यपदकांचा वाटा आहे. अखेरच्या दिवशी पृथ्वीराज टोंडायमन, लक्षय शेरॉन आणि कायनन चेनाय यांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताला अखेरचे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याआधी श्रेयसी सिंग, राजेश्वरी कु मारी आणि मनीषा कीर यांनी भारताला महिलांच्या ट्रप प्रकारात सुवर्णपदक जिंकू न दिले होते. भारताने महिलांच्या अंतिम फे रीत कझाकस्तानचा ६-० असा धुव्वा उडवला.

अंतिम लढतीत भारतीय महिलांनी आपल्यावर असलेल्या अपेक्षांची पूर्तता करत कझाकस्तानच्या महिलांना डोके  वर काढण्याची कोणतीच संधी दिली नाही. कझाकस्तानच्या सारसेनकु ल रायसबेकोव्हा, आयझान डोसमागामबेटोव्हा आणि मारिया दिमित्रियेंको यांना गुणांचे खातेही खोलता आले नाही. भारताचे हे १४ वे सुवर्णपदक ठरले.

पृथ्वीराज टोंडायमन, लक्षय शेरॉन आणि कायनन चेनाय यांनी ट्रॅप प्रकारात भारताला १५ वे सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात विजयवीर सिधू, गुरप्रीत सिंग आणि आदर्श सिंग यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांना सुवर्णपदकासाठीच्या सामन्यात अमेरिके च्या के थ सँडरसन, जॅक हॉबसन लेवरेट आणि हेन्री टर्नर लेवरेट यांच्याकडून २-१० अशी हार पत्करावी लागली.

घरच्या नेमबाजी केंद्रात खेळल्याचा फायदा भारताला मिळाला असून ऑलिम्पिकसाठीचे १६वे स्थान नेमबाजांनी निश्चित के ले. विजयवीर या युवा नेमबाजाने अप्रतिम कामगिरी करत लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या युवा नेमबाजाकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत, असे भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup shooting india best performance akp
First published on: 29-03-2021 at 00:07 IST