WPL 2023 Highlights Updates, MI-W vs RCB-W: महिला प्रीमियर लीगच्या १९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबईला दोन गुण मिळाले आणि आता त्याचे एकूण १२ गुण झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे १० गुण आहेत. दिल्लीला यूपी वॉरियर्सविरुद्ध सामना खेळायचा आहे. दिल्लीने हा सामना जिंकल्यास उत्तम नेट रनरेट असलेला संघ अव्वल स्थानावर जाईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युतरात मुंबई इंडियन्सने १६.३ षटकात ६ गडी गमावून १२९ धावा केल्या. त्याचबरोबर साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना जिंकला.
बंगळुरूने २० षटकांत नऊ गडी गमावून १२५ धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांसमोर बंगळुरूचा संघ चाचपडताना दिसला. एलिस पेरी आणि रिचा घोष या दोघींनी प्रत्येकी २९-२९ धावांचे योगदान दिले. अमेलिया केरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी इस्सी वोंग आणि नॅट सीव्हर ब्रंट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सायका इशाकने एक विकेट घेतली.
प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूची सुरुवात खराब झाली. सोफी डिव्हाईन (०) पहिल्याच षटकात धावबाद झाली. यानंतर अमेलिया केरने बंगळुरूला तीन धक्के दिले. तिने प्रथम कर्णधार स्मृती मंधानाला यष्टिका भाटियाकडे झेलबाद केले. मंधाना २४ धावा करू शकली. यानंतर हीदर नाइटला वोंगने झेलबाद केले. तिला १२ धावा करता आल्या. कनिका आहुजाला अमेलियाने यष्टिरक्षक यस्तिकाच्या हातून यष्टिचित केले. कनिकाला १२ धावा करता आल्या. एलिस पेरी आणि रिचा घोष या दोघींनी प्रत्येकी २९-२९ धावांचे सर्वाधिक धावांचे योगदान दिले.
एलिस पेरीला नॅट सीव्हर ब्रंट एलबीडब्ल्यू केले. तिला ३८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २९ धावा करता आल्या. त्याचवेळी श्रेयंका पाटील चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तिलाही नॅट सीवरने बोल्ड केले. मेगन शुटला सायका इशाकने एलबीडब्ल्यू केले. तिला दोन धावा करता आल्या. त्याचवेळी इस्सी वाँगने २० व्या षटकात ऋचा घोष आणि दिशा कासट यांना बाद केले. रिचा १३ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २९धावा करून बाद झाली. दिशाला दोन धावा करता आल्या.
Mumbai Indians Women (MI-W) vs Royal Challengers Bangalore Women (RCB-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला हायलाइट्स
महिला प्रीमियर लीगच्या १९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबईला दोन गुण मिळाले आणि आता त्याचे एकूण १२ गुण झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे १० गुण आहेत. दिल्लीला यूपी वॉरियर्सविरुद्ध सामना खेळायचा आहे. दिल्लीने हा सामना जिंकल्यास उत्तम नेट रनरेट असलेला संघ अव्वल स्थानावर जाईल.
१६ व्या षटकात पूजा आणि वाँग बाद झाली.
मुंबई इंडियन्सने १५ षटकानंतर ४ बाद ११५ धावा केल्या आहेत. त्यांना आता विजयासाठी ११ धावांची गरज आहे. सध्या अमेलिया २५ आणि पूजा १७ धावांवर खेळत आहेत.
मुंबई इंडियन्सला तिसरा आणि चौथा सलग बसला आहे. त्यामुळे मुंबई संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. नताली सीव्हर १३ आणि कर्णधार कौर २ धावांवर बाद झाली. मुंबईने १० षटकानंकर ४ बाद ७९ धावा केल्या आहेत. मुंबईला आता विजयासाठी ४७ धावांची गरज आहे.
आठव्या षटकात मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसला. मेगन शुटने हिली मॅथ्यूजला कर्णधार स्मृती मानधनाकडे झेलबाद केले. मॅथ्यूजने १७ चेंडूत २४ धावा केल्या. हरमनप्रीत कौर आणि नताली सायव्हर ब्रंट क्रीजवर आहेत. ८ षटकानंतर मुंबईने २ बाद ६८ धावा केल्या आहेत.
सहाव्या षटकात ५३ धावांवर मुंबईला पहिला धक्का बसला. श्रेयंका पाटीलने यस्तिका भाटियाला मंधानाकरवी झेलबाद केले. तिला २६ चेंडूत ३० धावा करता आल्या. सध्या हेली मॅथ्यूज आणि नॅट सीव्हर ब्रंट क्रीजवर आहेत.
NRR मधील डीसीला मागे टाकण्यासाठी एआयला हे लक्ष्य ११.३ षटकात गाठायचे आहे. तथापि, ते शीर्षस्थानी राहतील याची खात्री देता येणार नाही. कारण दिल्ली कॅपिटल्सचा शेवटचा सामना आहे, त्यामुळे जर त्यांनी मोठा विजय मिळवला तर काहीही होऊ शकते
मुंबईने तीन षटकांत एकही विकेट न गमावता २५ धावा केल्या आहेत. सध्या हेली मॅथ्यूज १५ धावा आणि यास्तिका भाटिया ७ धावांवर खेळत आहेत. दुस-या षटकात सोफी डिव्हाईनने मॅथ्यूजला बाद केले, पण अंपायरने ओव्हरस्टेपिंगमुळे तो चेंडू नो बॉल दिला.
१२६ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाने सावध सुरुवात केली आहे.
मुंबईकडून डावाची सुरुवात हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटियाने केली. त्याचबरोबर पहिल्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद ५ अशी आहे.
आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १२५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई संघासमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. एलिस पेरी आणि रिचा घोष दोघींनी प्रत्येकी २९-२९ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून अमेलिया केरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
बंगळुरूला १०८ धावांवर सातवा धक्का बसल आहे. सायकाने शुटला २ धावांवर तंबूत पाठवले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १७व्या षटकात दोन धक्के बसले. याआधी नॅट सीव्हर ब्रंटने एलिस पेरीला एलबीडब्ल्यू केले. तिला ३८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २९ धावा करता आल्या. यानंतर श्रेयंका पाटील बोल्ड झाली. तिला चार धावा करता आल्या. १७ षटकानंतर आरसीबीची धावसंख्या ६ बाद १०६
https://twitter.com/mipaltan/status/1638136596380766210?s=20
एलिस पेरी ३८ चेंडूत २९ धावा करुन बाद झाली.
नॅट सीव्हरने अॅलिस पेरीला पॅव्हेलियन पाठवले, तर अमेलियाने तीन गडी बाद केले.
१५ षटकांनंतर बंगळुरूने ४ गडी गमावून ७९ धावा केल्या आहेत. सध्या ऋचा घोष १ धाव करून क्रीजवर आहे आणि एलिस पेरी २८धावांवर खेळत आहे. या षटकात अमेलिया कारने कनिका आहुजाला यष्टिका भाटियाने यष्टिचित केले. तिला १२ धावा करता आल्या. अमेलियाने यापूर्वी मंधाना आणि हीदर नाइटला बाद केले होते.
https://twitter.com/mipaltan/status/1638132923584086016?s=20
१४ षटकांनंतर रॉयल चेंजर्स बंगळुरूने तीन गडी गमावून ७६ धावा केल्या आहेत. सध्या कनिका आहुजा १० चेंडूत ११ धावा करून क्रीजवर आहे आणि एलिस पेरी ३४ चेंडूत २७धावांवर खेळत आहे. मुंबईकडून अमेलिया कारने दोन बळी घेतले.
१३ षटकाच्या समाप्तीनंतर आरसीबी संघाने तीन बाद ६९ धावा केल्या आहेत.
कनिका आहुजा ५ आणि एलिस पेरी २६ धावांवर खेळत आहेत.
११ षटकांनंतर आरसीबीने तीन गडी गमावून ५९ धावा केल्या आहेत. एलिस पेरी आणि कनिका आहुजा सध्या क्रीजवर आहेत. ११ व्या षटकात अमेलिया कारने हीदर नाइटला इस्सी वोंगकरवी झेलबाद केले. तिला १३ चेंडूत १२ धावा करता आल्या. अमेलियाने यापूर्वी कॅप्टन मंधानाला बाद केले होते.
१० षटकांनंतर बंगळुरूने दोन गडी गमावून ५६ धावा केल्या आहेत. सध्या अॅलिस पेरी २० आणि हीदर नाईट ११ धावा करून क्रीजवर आहे. कर्णधार स्मृती मानधना २४ आणि सोफी डिव्हाईन भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतली.
बंगळुरूची कर्णधार स्मृती मंधाना २५ चेंडूत २४ धावा करून बाद झाली. तिला अमेलिया कारने यष्टिरक्षक यास्तिका भाटियाच्या हाती झेलबाद केले. मंधानाने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. एलिस पेरी आणि हीदर नाइट सध्या क्रीजवर आहेत. सात षटकांनंतर बंगळुरूची धावसंख्या दोन बाद ३७ धावा आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1638125940084555777?s=20
आरसीबीची प्रथम फलंदाजी करताना संथ सुरुवात झाली आहे. संघाने पावरप्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या १ बाद ३२
संघाने ४ षटकानंतर १ बाद १६ धावा केल्या आहेत.
स्मृती मंधाना २४(२५)
एलिस पेरी ८(१२)
आरसीबी संघाने ४ षटकानंतर १ बाद १६ धावा केल्या आहेत.
स्मृती मंधाना १० (१२)*
एलिस पेरी ६ (१०)*
दोन षटकांनतर आरसीबीची धावसंख्या १ बाद ४ अशी झाली आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1638119932608098307?s=20
आरसीबीला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे
सोफी डिव्हाईन भोपळाही न फोडता धावबाद होऊन तंबूत परतली आहे.
मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने पहिल्यांदाच नाणेफेक जिंकली.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा हा साखळी टप्प्यातील आठवा आणि शेवटचा सामना आहे. आठव्या सामन्यात हरमनप्रीतने नाणेफेक जिंकली आहे. तिने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्मृती मंधानानेही इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
https://twitter.com/mipaltan/status/1638114236353200128?s=20
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक
https://twitter.com/mipaltan/status/1638112962157133825?s=20
आरसीबी संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.
https://twitter.com/RCBTweets/status/1638112698104963073?s=20
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष (डब्ल्यू), कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना, प्रीती बोस
मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्मृती मंधानाचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.
कर्णधार स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर नाणेफेकीसाठी मैदानात हजर झाल्या आहेत.
नाणफेके जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यत आहे. कारण या मैदानावर धावांचा पाठलाग करणे सोपे असणार आहे.
महिला प्रीमियर लीगमधील १९ वा सामना आज डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
या उच्च धावसंख्येच्या ठिकाणी धावा सहज येतात. तांबड्या मातीच्या उसळीवर फलंदाज अवलंबून राहू शकतात जे त्यांचे शॉट्स लाईनमधून खेळू शकतात. या खेळपट्टीवर बचाव करण्यापेक्षा पाठलाग करणे खूप सोपे असेल, जे खूप चांगले आहे.
मुंबई इंडियन्स महिला संघ: यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, धारा गुजर, जिंतीमनी कलिता, सायका इशाक, क्लो ट्रायॉन, हीदर ग्रॅहम, पूजा वस्त्राकार, सोनम यादव, नीलम बिश्त, प्रियांका बाला
https://twitter.com/mipaltan/status/1637885043371548677?s=20
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ: स्मृती मंधाना (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना, प्रीती बोस, डेन वॅन निकर्क, एरिन बर्न्स, कोमल झांझाड, रेणुका ठाकूर सिंग, इंद्राणी रॉय, सहाना पवार, पूनम खेमनार
https://twitter.com/RCBTweets/status/1638094308778848256?s=20
दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार मेग लॅनिंगकडे ऑरेंज कॅप आहे. तिच्या नावावर आतापर्यंत सर्वाधिक धावांची नोंद आहे. तिने २७८ धावा केल्या आहेत.
https://twitter.com/wplt20/status/1638081929911336960?s=20
त्याचबरोबर पर्पल कॅपची मानकरी युपी वारियर्सची सोफी एक्लेस्टोन आहे. तिन १७ विकेट्स घेतल्या आहेत.
केवळ मुंबई आणि दिल्लीच्या संघांना थेट फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. जर मुंबई आणि दिल्लीने आपला सामना हरला, तर अंतिम फेरीसाठी पात्रता निव्वळ धावगतीच्या आधारावर ठरवली जाईल, जिथे सध्या दिल्ली क्रमांक १ वर, मुंबई २ नंबरवर आणि यूपी ३ क्रमांकावर आहे. आरसीबी चौथ्या आणि गुजराज जायंट्स पाचव्या स्थानावर आहे.
दिल्ली संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा विजय नोंदवला, ज्यामुळे WPL च्या पहिल्या सत्रातील गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.
https://twitter.com/wplt20/status/1637840219591548928?s=20
जरी मुंबई, दिल्ली आणि यूपीचे संघ डब्ल्यूपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत, परंतु महिला प्रीमियर लीग २०२३ च्या गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळेल, तर क्रमांक २ आणि क्रमांक ३ उर्वरित संघांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी एलिमिनेटर सामना जिंकावा लागेल. अशा स्थितीत आता अंतिम शर्यत खूपच रंजक बनली आहे.
आरसीबी संघाने स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली सात सामने खेळले आहे. त्यापैकी दोन सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. सुरुवातीच्या पाच सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
https://twitter.com/RCBTweets/status/1638075916369948672?s=20
मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले. त्याचबरोबर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे सध्या त्यांच्या खात्यात १० गुण आहेत.
मुंबई इंडियन्स १० गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्स १० गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

दोन्ही संघ लीगमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने असतील. याआधी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ९ गडी राखून पराभव केला. लीगमध्ये मुंबई संघाचे यश नेत्रदीपक ठरले आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1638080501222187008?s=20
बंगळुरु: सोफी डेव्हाईन, स्मृती मंधाना (कर्णधार), एलिस पेरी, हेदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना, प्रीती बोस
https://twitter.com/RCBTweets/status/1638083139091439616?s=20
मुंबई: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, इस्सी वाँग, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक
https://twitter.com/mipaltan/status/1638088229923741696?s=20
महिला प्रीमियर लीगमधील १९ वा सामना आज डॉ. डीवाय पाटील स्टेडियवर खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी साडेतीनला सुरुवात होणार आहे.
स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सशी होणार आहे. दोन्ही संघ लीगमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने असतील.
मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला हायलाइट्स</dd>
<dd class="wp-caption-dd"><strong style="font-size: 1.375rem;font-family: inherit">Mumbai Indians Women (MI-W) vs Royal Challengers Bangalore Women (RCB-W) <strong>Highlights </strong>Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला हायलाइट्स</strong>
रॉयल चॅलेंजर्स बंगलळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगचा १९ वा सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने हा सामना ४ विकेटने जिंकला.