Royal Challengers Bangalore Women vs UP Warriorz Women: मुंबईत सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. अशात आता शनिवारी डब्ल्यूपीएलचा आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात पासून खेळवला जाईल. तत्पुर्वी आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात भारतीय संघाची स्टार स्मृती मंधाना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधार आहे. त्याचबरोबर यूपी वॉरियर्सची कमान ऑस्ट्रेलियाची डॅशिंग खेळाडू अॅलिसा हिलीकडे आहे. हा सामना जिंकणे आरसीबीसाठी खूप महत्वाचे आहे. कारण जर ते हरले तर उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा कमी होऊ शकतात.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Indian Premier League Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad sport news
बंगळूरुच्या गोलंदाजांकडे लक्ष!
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 SRH vs CSK Highlights: चेन्नईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादने ६ विकेट्सने सहज जिंकला सामना
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

आरसीबी पहिल्या विजयाच्या शोधात –

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली बंगळुरूने ३ सामने खेळले आहेत. हे तीन सामने आरसीबीने गमावले आहेत. गुणतालिकेतही ते शेवटच्या स्थानावर आहेत, त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थित जिंकावे लागणार आहे.डब्ल्यूपीएल सुरू होण्यापूर्वी बंगळुरू हा सर्वात संतुलित आणि मजबूत संघ मानला जात होता. परंतु सलग ३ पराभवांनी त्यांना बॅकफूटवर आणले आहे. संघाकडे स्मृती, एलिस पेरी, सोफी डेव्हाईन आणि रेणुका सिंग यांच्या रूपाने मोठे मॅचविनर आहेत. पण संघ अजूनही विजय मिळवू शकलेला नाही.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाचा भारतात मोठा पराक्रम; मोडला दहा वर्षे जुना विक्रम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष (यष्टीरक्षक), एरिन बर्न्स, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, सहाना पवार, कोमल झांझाड, रेणुका ठाकूर सिंग

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड