ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याला गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी दक्षिण आफ्रिकेत जावे लागणार आहे. जागतिक स्पर्धा बुडापेस्ट (हंगेरी) येथे १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. योगेश्वरच्या गुडघ्यावर २००९ मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तरीही त्याने गतवर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक खेचून आणले होते. ‘‘जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक झालो होतो. या स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी मी कसून तयारी केली होती. मात्र पंधरा दिवसांपूर्वी गुडघ्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले आहे. या संदर्भात मी वैद्यकीय तज्ज्ञांकडे गेलो होतो. मात्र त्यांनी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच मला आफ्रिकेत शस्त्रक्रियेसाठी जावे लागणार आहे,’’ असे योगेश्वरने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2013 रोजी प्रकाशित
दुखापतीमुळे योगेश्वर दत्तची जागतिक कुस्ती स्पर्धेतून माघार
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे जागतिक कुस्ती
First published on: 04-08-2013 at 05:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogeshwar dutt out of international wrestling competition due to injuries