scorecardresearch

India Energy Week: मोदींना १६००० किमी दूरवरून पाठवली भेट; FIFA World Cup जिंकल्याबद्दल मेस्सी आणि अर्जेंटिनाचे केले होते कौतुक

PM Narendra Modi: फिफा विश्वचषक कतारमध्ये खेळला गेला होता. या विश्वचषकाच्या फायनल सामन्यात फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिना आणि लिओनेल मेस्सी यांचे अभिनंदन केले होते.

Pablo Gonzalez gifted Messi's T shirt to PM Modi in India Energy Week
पीएम नरेंद्र मोदी (फोटो-ट्विटर)

पंतप्रधान मोदींनी सोमवारी बेंगळुरू येथे इंडिया एनर्जी वीक-२०२३ चे उद्घाटन केले. यावेळी वायपीएफचे अध्यक्ष पाब्लो गोन्झालेझ यांनी सोमवारी पीएम नरेंद्र मोदी यांना अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेस्सीचा टी-शर्ट भेट दिला. दोघेही बेंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीकच्या निमित्ताने उपस्थित होते. कतारमध्ये खेळल्या गेलेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करून विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अर्जेंटिना आणि मेस्सीचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, ”हा सर्वात रोमांचक फुटबॉल सामना म्हणून लक्षात राहील. अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक चॅम्पियन बनवल्याबद्दल अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. अर्जेंटिना आणि मेस्सीच्या लाखो भारतीय चाहत्यांना महान विजयाचा आनंद आहे.”

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो एंजल फर्नांडिस यांनाही टॅग केले होते. पंतप्रधान मोदींनी सोमवार, ६ फेब्रुवारी २०२३ रोजी बेंगळुरू येथे भारत ऊर्जा सप्ताहाच्या उद्घाटनावेळी हरित ऊर्जा क्षेत्रातील तीन उपक्रम सुरू केले.

पंतप्रधान मोदींनी जागतिक गुंतवणूकदारांना देशातील ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिले –

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी बेंगळुरू येथे इंडिया एनर्जी वीक-२०२३ चे उद्घाटन केले. त्यानंतर देशातील ऊर्जा क्षेत्रातील वाढीची क्षमता जागतिक गुंतवणूकदारांसमोर मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना, देशातील तेल आणि वायू उत्खनन आणि हायड्रोजनसारख्या, नवीन ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक संधींचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्यास सांगितले.

हेही वाचा – IND vs AUS: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने VIDEO शेअर करत टीम इंडियाची उडवली खिल्ली; आकाश चोप्राने एकाच प्रश्नात केली बोलती बंद

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भारत जगातील सर्वोत्तम स्थान –

जागतिक गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी आमंत्रण देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात ऊर्जेच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय स्थिर आणि निर्णायक नेतृत्वामुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनीही पुढे यावे. आज जगातील ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारत हे सर्वात योग्य ठिकाण असल्याचे त्यांनी वर्णन केले. पुढील दशकात देशातील ऊर्जेची मागणी वेगाने वाढेल.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy: पहिल्या कसोटीपूर्वी मिचेल जॉन्सनने ऑस्ट्रेलियाला दिला गेम चेंजिंग सल्ला; म्हणाला, फक्त पहिल्यांदा ‘ही’ गोष्ट करा

देशातील गॅसच्या मागणीत ५००% वाढीचा अंदाज –

पीएम मोदी म्हणाले, ”मी तुम्हाला भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील सर्व संधींचा लाभ घेण्यास सांगत आहे. आज गुंतवणुकीसाठी भारत हे सर्वात योग्य ठिकाण आहे.” आंतरराष्ट्रीय ऊर्जा संघटनेचा हवाला देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, चालू दशकात भारताची ऊर्जेची मागणी सर्वाधिक असेल.
यामुळे गुंतवणूकदारांना देशातील ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या मागणीत भारताचा वाटा पाच टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत वाढेल, असे मोदी म्हणाले. त्याचबरोबर देशातील गॅसची मागणी ५००टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 11:27 IST