scorecardresearch

IND vs AUS: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने VIDEO शेअर करत टीम इंडियाची उडवली खिल्ली; आकाश चोप्राने एकाच प्रश्नात केली बोलती बंद

Akash Chopra on Cricket Australia: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या आधी टीम इंडियाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर भारत ३६ धावांवर ऑल आउट झाल्याचा व्हिडिओ जारी केला. त्यावर आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.

Akash Chopra asked this sharp question
आकाश चोप्रा (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून टीम इंडियाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, भारतीय संघाचा माजी कसोटी सलामीवीर आकाश चोप्रानेही ट्विटर हँडलवर तिखट प्रश्न विचारला आहे.

खरं तर, क्रिकेट डॉट कॉम एयूने आपल्या ट्विटर हँडलवर टीम इंडिया ३६ धावांवर ऑलआऊट झाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच आश्चर्यचकित झालेल्या इमोजीसह कॅप्शन लिहले की, “३६ ऑल आउट! बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गुरुवारपासून सुरू होणार आहे.” यावर आकाश चोप्रानेही तिखट सवाल केला असून तो ऑस्ट्रेलियाच्या तोंडावर चापट मारल्यासारखा आहे.

सीएच्या ट्विटर हँडलवरून व्हिडिओ पोस्ट करताच आकाश चोप्राने या मालिकेच्या स्कोअरलाइनबद्दल विचारले. आकाश चोप्राने ट्विट रिट्विट करत लिहिले, “आणि मालिकेची स्कोअर-लाइन? फक्त विचारत आहे.” आता बोलूया कोणता सामना होता? हा सामना अॅडलेडमध्ये खेळला गेला, जो मागील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना होता.

त्याच सामन्यातील दुसऱ्या डावात भारताने ३६/९ धावा केल्या होत्या. मोहम्मद शमी जखमी झाला, तेव्हा टीम इंडिया ऑलआऊट झाली होती. मात्र, मालिकेबद्दल बोलायचे झाले, तर भारताने पुढचा सामना ७ विकेटने जिंकला. तसेच तिसरा सामना अनिर्णित राहिला आणि चौथा सामना भारताने ३ विकेटने जिंकला. अशा प्रकारे भारताने मालिका २-१ ने जिंकली. आकाश चोप्राने या स्कोअर लाइनबद्दल सांगितले आहे.

हेही वाचा – टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी Sanju Samson सज्ज…! मैदानावर फुल इंटेनसिटीने गाळतोय घाम, पाहा VIDEO

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy: पहिल्या कसोटीपूर्वी मिचेल जॉन्सनने ऑस्ट्रेलियाला दिला गेम चेंजिंग सल्ला; म्हणाला, फक्त पहिल्यांदा ‘ही’ गोष्ट करा

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 09:35 IST