भारताच्या युकी भांब्रीला एटीपी चॅलेंजर स्पध्रेच्या एकेरीत गाशा गुंडाळावा लागला असला तरी दुहेरीत त्याने अंतिम फेरीत धडक मारली आहे. एकेरीत युकीला अव्वल मानांकित राशियाच्या तेयमुराज गाबाश्वीलीकडून १-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, दुहेरीत स्पेनचा सहकारी अ‍ॅड्रियन मेनेन्डीस-मर्कारियससह युकीने दुहेरीच्या उपान्त्य फेरीत एवगेनी डोन्स्कॉय आणि मॅथ्यु एबडेन या जोडीचा ३-६, ६-३, १०-७ असा पराभव केला.