भारताचा डावखुरा माजी फलंदाज युवराज सिंग याने २००७ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत सहा चेंडूवर सहा षटकार मारले. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर विजय मिळावला. याच सामन्यात युवराजने १२ चेंडूत अर्धशतक ठोकत सर्वात जलद टी २० अर्धशतकाचा विक्रमही केला. तो विक्रम आजही अबाधित आहे. युवराजने सहा षटकार मारले, त्यामागचं कारण फार कमी लोकांना माहिती आहे. पण नुकतेच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याच्याशी इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट करताना युवराजने एक धक्कादायक माहिती सांगितली.
“आफ्रिदी गेला खड्ड्यात… देशासाठी मी बंदूकही उचलेन”
“त्यावेळी अँड्र्यू फ्लिंटॉफ गोलंदाजी करत होता. त्याने दोन चेंडू चांगले टाकले, पण त्याने टाकलेल्या यॉर्कर चेंडू मी सीमापार पाठवला. त्यामुळे तो प्रचंड संतापला. तो मला म्हणाला की हा फटका खूपच घाण होता. (परत फटकेबाजी केलीस तर), तुझा गळा चिरून टाकेन. त्यावर मी त्याला बॅट दाखवली आणि म्हंटलं की ही बॅट बघितली का? या बॅटने मी तुला कुठल्या कुठल्या पाठवीन माहिती आहे का? त्यावेळी मी प्रचंड रागात होतो. आणि मग मी सहा चेंडूच्या सहा षटकार मारले”, असं युवराज पीटरसनला म्हणाला.
“रोज-रोज नाही…”; धोनीच्या चपळाईला जेव्हा बांगलादेशी फलंदाज मात देतो
“सहा षटकार मारल्यावर मी आधी दिमित्री मस्कारेनसकडे पाहिलं. त्याने माझ्या गोलंदाजीवर पाच चेंडूत पाच षटकार मारले होते. ते मला आठवलं. आणि त्यानंतर मी थेट फ्लिंटॉफकडे पाहिलं आणि त्याला बॅट दाखवली”, असेही युवराज म्हणाला.
युवराजच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकात २१८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात इंग्लंडनेही दमदार फलंदाजी केली. केव्हीन पीटरसन आणि ल्युक राईट यांनी चांगल्या धावा वसुल केल्या, पण सरतेशेवटी भारताने १८ धावांनी सामना जिंकला.