Yuzvendra Chahal Celebrates Birthday with Rumoured Girlfriend RJ Mahavash: भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने २३ जुलैला त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. युझवेंद्र चहल सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथेच त्याने आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसह वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. चहल सध्या काऊंटी आणि वनडे कपमध्ये खेळत असून तो नॉर्थम्पटनशायर संघाचा भाग आहे. यादरम्यान चहलच्या वाढदिवसाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

युझवेंद्र चहलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याच्या आजूबाजूला अनेक जण दिसत आहेत. चहलचे मोजकेच मित्र या पार्टीसाठी हजर आहेत. दरम्यान या पार्टीमध्ये त्याची कथित गर्लफ्रेंड आरजे महावश दिसत आहे. तर शिखर धवनने देखील चहलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

चहलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन व्हीडिओमध्ये आरजे महावश उपस्थित आहेच. पण या व्हीडिओमध्ये चहल येताच त्याने महावशला मिठी मारली आणि नंतर गाण्यावर नाचताना दिसला. यादरम्यान व्हीडिओमध्ये शिखर धवनही आहे. महावशची भेट घेतल्यानंतर चहल धवनला मिठी मारतो.

आरजे महावशने इन्स्टाग्रामवर चहलचा नवा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना युझी असा उल्लेख केलाय आणि पुढे कोरीयन हार्ट दिलाय. आरजे महावश आणि चहल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आयपीएल २०२५ पासून सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२५ पूर्वी युझवेंद्र चहल आणि आरजे महावश चॅम्पियन्स ट्रॉफी सामना पाहायला एकत्र पोहोचले होते. यानंतर महावश आयपीएलदरम्यान चहलचा संघ पंजाब किंग्स संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असायची. इतकंच नव्हे तर ती संघाच्या टीम बसमध्ये देखील दिसली होती. यानंतर आता चहल लंडनमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे. दरम्यान आरजे महावशदेखील सध्या लंडनमध्येच आहे. यावरून हे दोघेही एकत्र असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.