भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. युझवेंद्र चहलने धनश्री वर्मा हिच्याबरोबर घटस्फोट घेतला. यानंतर त्याचे नाव आरजे महावश हिच्याशी जोडले जात आहे. आयपीएल २०२५ चे सामने पाहण्यासाठी तिने हजेरी लावली होती. चहल यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा भाग होता. तेव्हा ती पंजाब संघाला सपोर्ट करताना दिसली आहे. दरम्यान आता आरजे महावश एका क्रिकेट संघाची मालकिण झाली आहे.
आरजे महवश सोशल मीडियावर पूर्वीपासून फारच प्रसिद्ध होती, पण तिचे नाव चहलशी जोडल्यानंतर ती अधिक प्रसिद्धीझोतात आली. दोघेही चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारताचा सामना एकत्र पाहण्यासाठी गेले होते, त्यानंतर दोघेही अनेक वेळा एकत्र दिसले होते. आयपीएल २०२५ मध्येही आरजे महावश पंजाब किंग्स संघाबरोबर होती. काहीच दिवसांपूर्वी चहलने त्यांच्या नात्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं.
नुकत्याच झालेल्या कपिल शर्मा शोमध्ये चहलला जेव्हा त्याला गर्लफ्रेंडबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला, आता तर संपूर्ण भारताला माहितीये. यामुळे आरजे महावश आणि युझवेंद्र चहल यांच्या नात्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा झाली आहे.
यादरम्यान आरजे महावशने चॅम्पियन्स लीग टी१० स्पर्धेत एका संघाची ती सह-मालक बनली आहे. क्रिकेट लीगमध्ये गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिने लीगच्या अधिकृत पेजवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिली. पण तिच्या संघाचे नाव अद्याप जाहीर केलेलं नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले अनेक मोठे खेळाडू चॅम्पियन्स लीग टी-१० मध्ये खेळताना दिसणार आहेत. यासोबतच अनेक युवा खेळाडूही त्यात खेळताना दिसतील. ही लीग २२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान एकूण ८ संघांमध्ये खेळवली जाईल.
युजवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे महवाश ही रेडिओ जॉकी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती एक कंटेंट क्रिएटर देखील आहे. अलीगढची असलेल्या महवाशने अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. तर क्रिकेटपटू चहलचा धनश्री वर्माशी घटस्फोट झाला आहे, जिच्याशी त्याने २०२० मध्ये लग्न केले होते. यानंतर त्याच्या आणि महवशच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या. कपिल शर्मा शोमध्ये चहलच्या वक्तव्यानंतर दोघांमधील नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.