Yuzvendra Chahal gets trolled after Dhanashree Verma’s photo goes viral : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अलीकडेच तिने सोनी टीव्हीच्या ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर, रविवारी तिने आपल्याला मिळालेल्या शुभेच्छांची स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केले. पण या स्टोरीतील एक फोटो असा होता, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आहे. वास्तविक, या फोटोत धनश्री तिच्या कोरिओग्राफर मित्राच्या पुढे उभा असलेली दिसत आहे. ज्यामुळे युजर्सनी सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडला आहे.

कोण आहे ती व्यक्ती?

टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माची सोशल मीडियावर ज्या व्यक्तीसोबतची पोस्ट व्हायरल होत आहे, ती दुसरी कोणी नसून प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रतीक उतेरकर आहे. प्रतीक उतेरकर नुकताच धनश्री वर्मासोबत ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. यादरम्यान त्यांच्यात मैत्री पाहायला मिळाली. प्रतीक उतेरकरची ही सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर ट्रोल करणाऱ्या युजर्सनी युजवेंद्र चहलशी संबंधित मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर फोटो आणि मीम्स व्हायरल –

सोशल मीडियावरील युजर्सनी फोटोवरून धनश्रीला वर्मा टार्गेट करायला सुरुवात केली आहे. यामध्ये धनश्रीचा पती आणि भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहललाही लोकांनी यात ओढले. युजर्स युजवेंद्र चहलबद्दलही मीम्स तयार करुन शेअर करत आहेत. ज्यामध्ये अनेकांनी चहलबद्दल सहानुभूती दाखवली आहे, त्याचबरोबर काही लोकांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा – Yuzvendra Chahal : ‘झलक दिखला जा’च्या सेटवर संगीता आणि चहलमध्ये रंगला ‘WWE’ सामना, VIDEO होतोय व्हायरल

युजवेंद्रचाही व्हिडीओ झाला होता व्हायरल –

‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोच्या पार्टीदरम्यान, भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाटने टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलला खांद्यावर उचलून गोल-गोल फिरवले. भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाटने युजवेंद्र चहलला अशा प्रकारे फिरवले की, ज्यामुळे त्याला चक्कर येताना दिसली. यानंतर युजवेंद्र चहलने हसत-हसत संगीता फोगाटला थांबण्याचा इशारा केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.