21 September 2020

News Flash

ट्रिपटिप्स : जंगल भ्रमंतीत काय टाळावे?

जंगल भटकताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपला पेहराव. हा कायम निसर्गातील रंगांशी सुसंगत असणे गरजेचे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

* जंगल भटकताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपला पेहराव. हा कायम निसर्गातील रंगांशी सुसंगत असणे गरजेचे आहे. पक्षी पाहायला जाताना तर हे बंधन नक्कीच पाळावे, अन्यथा वन्यजीव आणि पक्ष्यांचे दर्शन दुर्मीळ होऊ शकते.

* पेहरावाबरोबरच अंगावर डिओ, अत्तराचे फवारेदेखील मारू नयेत. या कृत्रिम वासांमुळे प्राण्यांना आपली चाहूल लागते आणि ते दूर जातात.

* आपला आवाज, गोंगाट, मोबाइलवरील संगीत, मोबाइलवरील पक्ष्यांचे आवाज हे सर्व त्या वातावरणाशी सुसंगत नसते. ती कृत्रिमता टाळणे योग्य ठरू शकेल.

* हल्ली पक्षी पर्यटनामध्ये एक अतिशय घातक ट्रेण्ड दिसून येत आहे, तो म्हणजे या पक्ष्यांना फरसाण व इतर खाद्यपदार्थ देणे. पक्ष्यांचे नैसर्गिक खाद्य या सदरात या बाबी मोडत नाहीत. त्यामुळे अशा पदार्थाची सवय त्यांना लावणे योग्य नाही आणि ते त्यांच्या पचनसंस्थेसाठी घातक आहे. हे प्रकार तर पूर्णपणे टाळायलाच हवेत. असेच प्रकार माकड व अन्य काही प्राण्यांबाबत होतात. तेदेखील टाळावेत.

* डीएसएलआर कॅमेरा हा आता अनेकांच्या हातात अगदी सहज दिसतो. पण दुर्बीण मात्र अगदीच मर्यादित स्वरूपात दिसते. दूरवरचे पक्षी, प्राणी न्याहाळण्यासाठी दुर्बीण हे अतिशय महत्त्वाचे साधन आहे.

* जे काही दिसेल ते कॅमेऱ्यातच कैद केले पाहिजे हा अट्टहास न धरता, दुर्बणिीतून हे जैववैविध्य न्याहाळता आले तर त्याची मजा काही औरच आहे हे लक्षात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 12:11 am

Web Title: article about what to avoid in the wilderness of the jungle
Next Stories
1 बांबू चिकन आणि कॉफी
2 शहर शेती : रोप लावताना..
3 टेस्टी टिफिन : केळ्याचे गोड काप
Just Now!
X