21 September 2020

News Flash

शक्तिशाली स्पीड ट्वीन

मोटारसायकलीची आकर्षक किंमत ही तिच्या बाजारातील भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मोटारसायकल क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रिटिश प्रीमियम मोटारसायकल कंपनी ट्रायम्फ मोटारसायकल्सने स्पीड ट्वीन ही नवी मोटारसायकल भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. मॉडर्न क्लासिक श्रेणीतील या मोटारसायकलमध्ये ट्रायम्फच्या वैशिष्टय़ांची जोड देण्यात आली आहे. मोटारसायकलची शैली ही ट्रायम्फचा आधुनिक आणि पारंपरिक वारसा जपणारी आहे. मोटारसायकलीची आकर्षक किंमत ही तिच्या बाजारातील भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

२०१९ स्पीड ट्वीन ही ट्रायम्फच्या मॉडर्न क्लासिक शृंखलेतील नवी मोटारसायकल आहे,  सध्याच्या बोनव्हीलमध्ये सुधारणा करीत ही नवी स्पीड ट्वीन बाजारात दाखल करण्यात आली आहे. थ्रक्स्टन आर मध्ये १२०० सीसीचे शक्तिशाली इंजिन, उत्तम हाताळणी आणि स्पोर्टी शैली असली तरी तिची आसणव्यवस्था मोठय़ा प्रवासात तितकीशी आरामदायी नाही. हीच उणीव भरून काढण्याचा प्रयत्न स्पीड ट्वीनकडून केला जाणार आहे. नव्या स्वतंत्र चासीवर तयार करण्यात आलेली ही मोटारसायकल वजनाने थ्रक्स्टन आरहून हलकी आहे. तर चालकाला आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.

ट्रायम्फ मोटारसायकलच्या लोकप्रिय बोनेव्हिल शृंखलेतील या मोटारसायकलने मागील वर्षी डिसेंबर २०१८ मध्ये जागतिक बाजारात पदार्पण केले. स्पीड ट्वीन हि बोनव्हील टी १२० आणि थ्रक्स्टन आर या दोन्ही मोटारसायकलींच्या मध्ये आपली जागा बनवते. अधिक ताकदीची पण चालवण्यास जास्त सोपी बाईक म्हणून स्पीड ट्वीन निर्माण करण्यात आली आहे. नवीन स्पीड ट्वीनमध्ये १२०० सीसी क्षमतेचे ८ व्हॉल्व्हचे ट्वीन इंजिन बसण्यिात आले असून नव्या स्पीड ट्वीनसाठी यात सुधारणा करण्यात आली आहे.

सुधारित इंजिनमध्ये लो इनर्शिया क्रॅन्क आणि हाय कॉम्प्रेशन हेड ही  वैशिष्टय़े देण्यात आली आहेत. मॅग्नेशियम कॅम कव्हर, सुधारित कल्च असेम्ब्ली आणि इंजिन कॉव्हरमुळे इंजिनचे वजन थ्रक्स्टन आरहून अडीच किलोने कमी झाले आहे.

६,७५० आरपीएमला मिळणारी ९७ पी एसची पीक पॉवर असलेल्या नव्या स्पीड ट्वीनची क्षमता स्ट्रीट ट्वीनच्या २०१६/१७ च्या आवृत्तीच्या तुलनेत ७६ टक्क्य़ांनी तर २०१८ च्या आवृत्तीच्या ४९ टक्कय़ांनी वाढली आहे. याखेरीज नव्या स्पीड ट्वीनचे इंजिन ११२ एनएम @ ४,९५० आरपीएम एवढा टॉर्क पुरवते. हे प्रमाण २०१८च्या स्पीड ट्वीनच्या तुलनेत ४० टक्के अधिक आहे.

मोटारसायकलमध्ये लिक्विड कूलिंग सिस्टिम बसवण्यात आली आहे. ज्यामुळे हवा उत्सर्जित होऊन इंधनाची कार्यक्षमता वाढते. विशेष म्हणजे स्पीड ट्वीनसाठी पहिल्या सव्‍‌र्हिस इंटर्वलचा कालावधी १६०० किमीपर्यंत लांबवण्यात आल्याने या मोटारसायकलच्या बाळगण्याच्या एकूण खर्चात घट होते. थ्रक्स्टन आरमधून विकसित करण्यात आलेली नवी स्वतंत्र फ्रेम या मोटारसायकलला रोडस्टर एर्गानॉमिकस पुरवते. थ्रक्स्टनच्या तुलनेत या मोटारसायकलच्या एकंदर वजनात १० किलोची घट आकारण्यात आली आहे. ज्यामुळे या गाडीच्या हँडलिंगमध्ये सुधारणा झाली आहे.

हल्ली मोटारसायकल बाजारात प्रचलित असलेले रेट्रो मॉडर्न डिझाइन या स्पीड ट्वीनमध्ये पाहायला मिळते. केवळ सीट आणि इंधन टाकी असलेले बॉडी पॅनल मोकळे आणि सुटसुटीत ठेवण्यात आले आहे. १७ इंची चाकांना डिस्क ब्रेक आहेत. इंन्स्ट्रुमेन्ट क्लस्टर डय़ुअल अनालॉग आहे. त्यासह टॉर्क असिस्ट कल्च, ट्रक्शन कंट्रोल, एबीएस, यूएसबी पॉवर सॉकेट या सुविधा मोटारसायकलीत आहेत.

स्पीड ट्वीन ही ट्रायम्फच्या मॉडर्न क्लासिक शृंखलेत सगळ्यात महत्त्वाची मोटारसायकल आहे. या मोटारसायकलची किंमत अन्य कंपनीच्या तुलनेत स्पर्धात्मक ठेवण्यात आली आहे. भारतात स्पीड ट्वीनला कोणत्याही कंपनीकडून थेट स्पर्धा मिळणार नाही तरीही या मोटारसायकलची क्षमता पाहता तिची तुलना बीएमडब्ल्यू आर नाईन टी ( १७. ४५ लाख रुपये) आणि डुकाटी स्क्रमलर ११०० (११.४२ लाख रुपये ) यांच्याशी होऊ  शकते. स्पीड ट्वीन ही बोनव्हील  टी १२० हून ३२,००० हजारांच्या स्वस्त तर थ्रक्स्टन आरहून २.४६ लाखांनी स्वस्त आहे. यामुळे बोनव्हील शृंखलेतील स्पीड ट्विन ही किमतीच्या दृष्टीने १२०० सीसीचे पॅरलल ट्वीन इंजिन असलेले सर्वात किफायती पर्याय ठरते.

ही मोटारसायकल तयार करताना चालकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीचाही विचार करण्यात आला आहे. त्यासाठी स्पीड ट्विनमध्ये ८० वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीस देण्यात आल्या आहेत.

स्पीड ट्वीन

हॉर्स पॉवर : ९७ पीएस / ७१.५ केडब्ल्यू @ ६.७५० आरपीएम

टॉर्क : ११२ एनएम @ ४,९५० आरपीएम

इंजिन : १२०० सीसी

रंग : जेट ब्लॅक, कोरोसी रेड आणि स्टॉर्म ग्रे, सिल्वर इस आणि स्टॉर्म ग्रे

किंमत : ९.४६ लाख (एक्स शोरूम इंडिया)

स्पीड ट्वीनचा इतिहास

एडवर्ड टर्नर यांनी डिझाइन केलेली ही गाडी ब्रिटिश मोटारसायकलच्या इतिहासातील निर्णायक टप्पा मनाली जाते. माध्यम क्षमतेचे ५०० सीसीचे पॅरलल ट्वीन त्याकाळी मोटारसायकल बाजारात क्रांतिकारक नव्हते. परंतु ५ टी स्पीड ट्वीन ही त्या काळी उपलब्ध असणाऱ्या अधिक ताकद आणि ऊर्जेच्या मोटारसायकलच्या तुलनेत वजनाने हलके होती. १९३७ मध्ये नॅशनल मोटारसायकल शोमध्ये या स्पीड ट्वीनने पदार्पण केले. ही पहिली यशस्वी ब्रिटिश पॅरललं ट्वीन मोटारसायकल ठरली. या मोटारसायकलने बाजारात नवे मापदंड निर्माण केले. दुसऱ्या महायुद्धानंतर ट्रायम्फ बाजारात तग धरून राहण्यात स्पीड ट्वीन कारणीभूत होती.

वैशिष्टय़े

* थ्रक्स्टन टय़ून्स हा सुधारित १२०० सीसी हॉर्सपॉवर बॉन्व्हाईल ट्वीन इंजिन

* नवी स्वतंत्र चासी आणि सस्पेन्शन सेटअप

* तीन रायिडग मोड : रेन , रोड, आणि स्पोर्ट

* थ्रक्स्टनच्या तुलनेत १० किलोने कमी वजन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 12:08 am

Web Title: article on powerful speed twin
Next Stories
1 मस्त मॉकटेल : आइस्ड चॉकलेट
2 व्हिंटेज वॉर : इतिहास ‘कॅफे रेसर’चा
3 उन्हाळ्यातील भटकंती
Just Now!
X