05 March 2021

News Flash

योगस्नेह : वीरभद्रासन-१

या आसनामुळे हात, खांदे, गुडघे, मांडय़ा आणि कंबरेचे स्नायू बळकट होतात.

(संग्रहित छायाचित्र)

भगवान शंकराचा गण असलेल्या वीरभद्र या नावावरून या आसनाला वीरभद्रासन असे नाव पडले आहे. इंग्रजीमध्ये या आसनाला वॉरिअर पोझ असे म्हटले जाते. या आसनाचे दोन प्रकार आहेत. सध्या आपण वीरभद्रासन १ हा प्रकार पाहू. या आसनामुळे हात, खांदे, गुडघे, मांडय़ा आणि कंबरेचे स्नायू बळकट होतात.

कसे करावे?

* दोन्ही पायांमध्ये तीन ते चार फुटांचे अंतर ठेवा आणि सरळ उभे राहा.

*  उजवा पाय मागच्या बाजूला घेऊन थोडा पसरवा. हा पाय पसरवताना गुडघ्यात दुमडला नाही पाहिजे.

*  डावा पाय पुढे करून गुडघ्यात दुमडवा.

*  दोन्ही हात सरळ हवेत पसरवा. हाताचे तळवे वरच्या बाजूला असावेत.

*  थोडा वेळ याच स्थितीत राहा. नंतर श्वास घेत सामान्य स्थितीत या.

* आता हेच आसन डाव्या बाजूने करावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 2:25 am

Web Title: article on virbhadrasan
Next Stories
1 घरचा आयुर्वेद : आम्लपित्त
2 काळजी उतारवयातली : कर्करोग : लक्षणे व प्रतिबंध
3 सर्वगुणसंपन्न
Just Now!
X