News Flash

चलती का नाम.. : त्याचं-तिचं दिसणं..

मुलांमध्येही शिमर ब्लेझर, शायनिंग शर्ट्स, ग्लिटर टाय आणि पोनी स्टाईलचे टाय ट्रेण्ड ट्रेण्डमध्ये आहेत.

गायत्री हसबनीस

१४ फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस. या दिवशी युवकआणि युवतींच्या गाठीभेटीला जितके  महत्त्व आहे, तितकंच त्या दिवशी दिसण्यासाठी आकर्षक आऊटफिट्सच्या आवर्जून केलेल्या खरेदीचंही असतं.

१४ फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस. या दिवशी युवक आणि युवतींच्या गाठीभेटीला जितके महत्त्व आहे तितकंच आकर्षण हे त्या दिवशीसाठी आवर्जून केलेल्या खरेदीचं असतं. ‘व्हॅलेन्टाईन डे’पूर्वी बरेच नाना तऱ्हेचे ‘डेज’ साजरे केले जातात. त्यात चॉकलेट डे, रोझ डे, टेडी डे, किस डे, हग डे, प्रपोज डे, प्रॉमिस डे यांसारख्या दिवसांचा समावेश असतो. त्याकरिता बुके, चॉकलेट्स, गिफ्ट्सचे शोधकार्य आठवडय़ाभरापूर्वीच सुरू होते आणि ते ‘व्हॅलेन्टाईन डे’पर्यंत चालू असते. आता यात फक्त भेटवस्तूंचा विचार होत नाही, पण ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने येणारी मोहक फॅशन तरुणाईला जास्त खुणावत असते. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मॉल्सपासून, फॅशन स्टोअपर्यंत ते अगदी स्ट्रीट शॉपिंगपर्यंत ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने कपडे आणि अ‍ॅक्सेसरिजच्या खरेदीला उधाण आलेले असते. त्यामुळे या दिवशीसाठी होत असणारी स्पेशल खरेदी ही जास्त करून फॅशनेबल दिसण्यासाठी राखून ठेवलेली असते.

ऑनलाइन क्षेत्रात ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने येणारी फॅशन ही बऱ्यापैकी स्वस्त दरात उपलब्ध होते. कारण दिवाळी, नववर्षांप्रमाणे ग्राहकांना ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्तानेही बरीच सवलत मिळते. ‘व्हॅलेन्टाईन डे’ म्हटला की लाल, गुलाबी, मरून, बेबी पिंक असे रंग यंदाही आहेत. हे रंग असे आहेत की फॅशन डिझायनर्सनाही वेगळे प्रयोग करायला वाव मिळतो, ज्यात ‘व्हॅलेन्टाईन डे’ला केंद्रस्थानी ठेवून ते डिझाइन्स आखले जातात.

आताच्या जमान्यात प्रिंट्स, पॅटर्न्‍स आणि स्लोगन अशा तऱ्हेच्या डिझाइन्स ट्रेण्ड आहे ज्यात अगदी कॅज्युअल वेअर येतात. उदा. टी-शर्ट, पॅन्ट्स, केपरी, वनपीस, स्कर्ट्स आणि जॅकेट्स असतात. शिमर आणि ग्लिटरमध्येही गाऊन्स, मिडी, जम्पसूट, लॉन्ग जॅकेट्स अशा गोष्टी येतात. यात सध्याच्या ट्रेण्डनुसार फक्त लाल वा गुलाबी रंगाच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये शिमरचे आऊटफिट्स न येता ते आता काळ्या रंगातही उपलब्ध आहेत. कारण मुलींना शिमरचे कोणतेही आऊटफिट्स काळ्या रंगातच जास्त करून पसंत पडतात. ‘व्हॅलेन्टाईन डे’ला डेटला डिनरकरिता जाण्यास ब्लॅक शिमरचा वनपीस त्याखाली हिल्स आणि मिनी शोल्डर बॅग्ज असा लूक योग्य ठरेल. याव्यतिरिक्त बॅकलेस वनपीसही यंदा ट्रेण्डमध्ये उतरले आहेत. यात प्लॅन आणि शिमर असे दोन्ही पॅटर्न्‍स आहेत. काळ्याप्रमाणेच मरून, स्किन कलर आणि ब्राऊन हे रंगही पाहायला मिळतील. सध्या ऑनलाइन शॉपिंग मुली जास्त करतात, पण ही तरीही अधिक ऑप्शन्स शोधण्यासाठी बऱ्याच मुली ऑफलाइन शॉपिंगही करतात. जे पर्याय ऑनलाइनवर उपलब्ध असतात ते तसेच लोकल मार्केटमध्येही त्यांचा शोधण्याचा कल जास्त असतो आणि तसे ते उपलब्धही असतात. मुलांमध्येही शिमर ब्लेझर, शायनिंग शर्ट्स, ग्लिटर टाय आणि पोनी स्टाईलचे टाय ट्रेण्ड ट्रेण्डमध्ये आहेत.

हल्लीच्या मुलींना टी-शर्ट आणि जीन्समध्येही जास्त रस असतो. ‘लव्ह’, ‘मेड फॉर इच अदर’, ‘हि इज माईन’ इत्यादी तऱ्हेचे शब्द लिहिलेले टी-शर्ट खूप आवडतात, ज्यात लाल रंगच असतो. पण त्याहूनही जास्त मुलामुलींना कपल टी-शर्ट म्हणून प्रसिद्ध असलेले टी-शर्ट्स जास्तच आवडतात. हा ट्रेण्ड सर्वात जास्त लोकप्रिय आहे. थोडक्यात या कपल टी-शर्ट्समध्ये एक मुलीसाठी आणि दुसरा मुलासाठी असतो आणि त्यात एक वा दोन शब्दांचे मॅच केले जाते. जसे की लव्ह हा शब्द असेल तर मुलीकरिता त्या शब्दातला एल आणि ओ ही अक्षरं टी-शर्टवर असतात तर मुलाकरिता व्ही आणि ई हे दोन शब्द त्याच्या टी-शर्ट वर असतात. जर मॅरिड कपल असेल तर हबी आणि वाईफी असेही टी-शर्ट असतात. दोघांच्या टी-शर्टवर एक हार्ट, मिनी आणि मिकी माऊस, सोल मेट असे आणि नानाविध स्टाईल्स ट्रेण्डमध्ये आहेत. मुलींच्या हिशोबाने आता रिंग्स, इयरिंग्स, ब्रेसलेट, नेकपीस इ. गोष्टी या ‘व्हॅलेन्टाईन डे’ला ट्रेण्डी आहेत, पण त्याहूनही मुलींना आणि मुलांना कॅप्स, शूज्स आणि सनग्लासेस असे ‘स्वॅग’ निर्माण करणाऱ्या अ‍ॅक्सेसरिज जास्त भावतायत हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 5:01 am

Web Title: couple outfits for valentines day valentine s day outfit zws 70
Next Stories
1 पेटटॉक : कायद्याचे भान ठेवा      
2 व्हेगन रेड लेन्टिल सूप
3 coronavirus : ‘करोना’ला घाबरू नका!
Just Now!
X