News Flash

सांगे वाटाडय़ा : हे विसरलात तर खिशाला कात्री

सवयीच्या वस्तू न मिळाल्यास गैरसोय होऊ शकते.

देशांतर्गत प्रवास करताना विशेषत: शहरी, निमशहरी भागांना भेट देताना आपल्या नेहमीच्या वापरातील वस्तूंपैकी एखादी वस्तू घरीच राहिली तरी फार काही नुकसान होत नाही. जिथे जाऊ तिथे ती खरेदी करता येते. पण परदेशात प्रवास करताना किंवा अतिदुर्गम भागांत जाताना असा विसरभोळेपणा महागात पडू शकतो. सवयीच्या वस्तू न मिळाल्यास गैरसोय होऊ शकते.

  • सौंदर्यप्रसाधने, टॉयलेटरीज, छत्री, औषधे, कवळी यांचे शक्य असल्यास दोन सेट सोबत असावेत. अनोळखी प्रदेशात आपल्या सवयीचा आणि सोयीस्कर पर्याय मिळेलच याची खात्री नसते. प्रवासातील खर्चात विनाकारण वाढ होऊ शकते.
  • कोणत्याही प्रकारचे द्रवपदार्थ, परफ्युम, टोकदार वस्तू, बॉडी स्प्रे हे विमानात केबिन लगेजमध्ये (आपल्या सोबत घेऊन जाता येणारी बॅग) नेण्यास मनाई आहे. अशा वस्तू सुरक्षा अधिकारी बॅगेतून काढून ठेवण्यास सांगू शकतात. अशा वेळी त्या वस्तूंवर पाणी सोडावे लागतेच, पण ती विकत घेण्यासाठी परदेशात पुन्हा खर्च करावा लागतो. तोदेखील तेथील चलनात. ते कदाचित महागात पडू शकते. त्यामुळे या वस्तू चेकइन लगेजमध्येच ठेवाव्यात.
  • हल्ली अनेक देशांमध्ये स्थानिक मोबाइल सुविधा पुरवणारे कार्ड पासपोर्टच्या आधारे विकत घेता येते. आपल्या देशातून जातानादेखील आपण परदेशात चालणारे सिम कार्ड घेऊन जाता येते. ही माहिती आधीच घ्यावी. तुलनेनं जो पर्याय सोयीस्कर, दर्जेदार आणि स्वस्त असेल तो स्वीकारता येतो.
  • अनेक विमान कंपन्या, पर्यटन कंपन्या प्रवासी विम्याची सुविधा देतात. पण तरी आपणदेखील असा विमा खरेदी करावा. एकूण प्रवासखर्चाच्या तुलनेत अगदीच कमी खर्चात (सुमारे ५०० ते १५०० रुपये) असा विमा घेता येतो. सामान हरवणे, प्रवासादरम्यान आजारी पडणे, अपघात होणे अशा अनेक प्रसंगी याचा फायदा होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2018 1:00 am

Web Title: needful objects for travelling
Next Stories
1 युअर टय़ूब!
2 न्यारी न्याहारी : टोमॅटो शोरबा
3 सेल्फ सव्‍‌र्हिस : मिक्सरची निगा
Just Now!
X