|| अनिल पंतोजी

रुंदी मर्यादा

हे चिन्ह वाहनाची रुंदीमर्यादा निश्चित करते. या चिन्हात दर्शविलेल्या आकडय़ापेक्षा जास्त रुंदीच्या वाहनांना प्रवेशबंदी असते. या चिन्हाचा वापर अरुंद पूल अथवा अरुंद रस्ता येथे केला जातो.

लांबी मर्यादा हे चिन्ह दर्शविलेल्या ‘अंकापेक्षा जास्त लांबीच्या वाहनास मनाई आहे’ याबाबत सूचित करते.

वाहनाची लांबी जास्त अथवा मोठय़ा वजनाचा/ आकाराचा माल घेऊन जाणारी वाहने तीव्र वळणावर अडकून पडतात. सदर चिन्हाचा अर्थ माहीत नसल्याने अथवा दुर्लक्ष केल्याने असा अनर्थ घडतो.

चालकाला आपल्या वाहनाची लांबी, आकार माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.

भार सीमा

हे चिन्ह ‘नमूद आकडय़ापेक्षा जास्त वजन असलेल्या वाहनास मनाई आहे’ याबाबत सूचित करते.

आपल्या मार्गातील काही रस्ते, पूल मर्यादेपेक्षा जास्त वजन पेलण्यास कमकुवत असतात. चिन्हात दर्शविलेल्या अंकापेक्षा जास्त वजन पेलू शकत नाहीत. काही रस्ते भुसभुशीत असतात, त्यामुळे वाहने त्यात रुतण्याची शक्यता असते. अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी गाडीत किती भार आहे हे चालकाला निश्चित माहीत असणे गरजेचे आहे.