या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे थंड. शीतली प्राणायाम आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी केले जाते. या प्रकारात तोंडावाटे हवा आत घेऊन नाकावाटे सोडली जात असल्याने शरीराला थंडावा मिळतो. या प्राणायामाने मध्यवर्ती मज्जासंस्था शिथिल होते. पोटशूळ, ताप, पित्तविकार तसेच चिडचिड कमी करण्यासाठी प्राणायामाचा हा प्रकार महत्त्वाचा आहे. नित्य सरावामुळे उच्च रक्तदाबही नियंत्रित होतो.

कसे करावे?

* जमिनीवर शांत बसा.

* डोळे बंद करा आणि ध्यानस्त व्हा.

* जीभ बाहेर काढा. जीभ दोन्ही बाजूने थोडी वळवा. जिभेला नळीसारखा आकार येईल.

* जिभेद्वारे तोंडातून श्वास आतमध्ये घ्या आणि नाकाद्वारे सोडा.

* श्वास आतमध्ये घेताना हवेनुसार ध्वनी निर्माण होईल. त्याशिवाय श्वास आतामध्ये घेताना थंडावा जाणवेल.