ज्योती चौधरी-मलिक

साहित्य

अडीच वाटय़ा ताजे मटार दाणे, २ बटाटे, १०/१२ लसूण पाकळ्या, १ इंच आलं, गाजराचे तुकडे १ वाटी, ३/४ हिरव्या मिरच्या, १ मध्यम मोठा कांदा, १मोठा टोमॅटो, १ चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, तेल, मोहरी अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, १/१ चमचा काळा मसाला + गरम मसाला, दोन वाटय़ा कढत पाणी

कृती- मटार दाणे निवडून, धुऊन घ्या. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या. बटाटय़ाची सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करून पाण्यात घालून ठेवा. आलं, मिरची, लसूण बारीक वाटून घ्या. लोखंडी कढईत तेल तापत ठेवा. तेल तापलं की मोहरी, हिंग घालून फोडणी करा. त्यात आलं-मिरची-लसूणाची वाटलेली गोळी घाला. त्यानंतर बटाटा मटार आणि गाजर घालून परतून घ्या. सर्व भाजीला तेल-मसाला लागला की हळद, लाल तिखट, काळा आणि गरम मसाला, मीठ घालून परता. त्यात टोमॅटोच्या फोडी आणि कढत पाणी घालून झाकून शिजून द्या.