कागदाचे डबे केराच्या टोपलीत टाकताना विचार करा. प्लास्टिकबंदीमुळे बरेच समान कागदात गुंडाळून किंवा खोक्यातून मिळू लागले आहे. या खोक्यांचा पुनर्वापर करू या.
साहित्य :
रंगीत कार्ड पेपर २, कात्री, पेन्सिल, गम, कागद, चित्रांचे जुने पुस्तक, जुना कागदी उभा खोका इत्यादी.
कृती
* जुना कागदी उभा खोका पूर्ण उघडा.
* आतील बाजूस सारख्या आकाराच्या खिडक्या कापा.
* सर्व बाजूंना रंगीत कार्ड पेपर चिकटवा.
* खोक्यावर ज्या रंगाचा कार्डपेपर चिकटवला आहे, तो रंग वगळता इतर कोणत्या तरी रंगाच्या कागदाच्या पट्टय़ा खिडकीच्या मापाने कापा.
* चित्रांच्या जुन्या पुस्तकातील चित्रे कापा. हे कोडे जे मूल सोडवणार आहे, त्याच्या वयानुसार चित्रांची निवड करा. ही चित्रे खिडक्यांच्या मापात बसतील एवढय़ाच आकाराची असावीत.
* तुमच्या चित्रकलेलासुद्धा वाव देता येईल.
* डब्यात मावतील तितक्या पट्टय़ा रंगवू शकाल.
* कोडे आपल्या आवडीनुसार डिझाइन करता येईल.
* एका पट्टीवर अक्षरे लिहून दुसऱ्या पट्टीवर त्या अक्षरावरून सुरू होणाऱ्या शब्दांची चित्रे चिकटवता येतील.
* अशाच प्रकारे विरुद्धार्थी, समानार्थी, जोडय़ा जुळवा असे खेळही तयार करता येतील.
* सतत काही नवे शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या छोटय़ा दोस्तांसाठी ही गम्मत घरच्या घरी करून पाहाच!
apac64kala@gmail.com