आजचा व्यायाम जखडलेले खांदे सोडविण्यासाठी आहे. यासाठी दुपट्टा वापरा किंवा तितक्याच लांबीचा इतर कोणतेही कापड घेता येईल. या प्रकारात दोन्ही खांद्यांना पुरेपूर व्यायाम मिळतो.

कसे कराल?

१ सुरुवातीला उजव्या हाताचा खांदा कानाच्या जवळ घ्या. या वेळी कोपर सरळ रेषेत ठेवा आणि उजव्या हाताच्या मनगटाने दुपट्टा घट्ट पकडा. याच वेळी डाव्या हाताचे कोपर ताठ ठेवा. आता डावा हातही सरळ रेषेत असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२ छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आता उजव्या हाताचे कोपर शरीराशी समांतर ठेवत खाली आणा आणि त्याच वेळी डावे कोपर वर न्या. आता हीच क्रिया डाव्या हाताचे कोपर खाली आणि उजव्या हाताचे कोपर वर न्या.

डॉ. अभिजीत जोशी – dr.abhijit@gmail.com