अनिल पंतोजी

रस्त्यावरील वाहनविषयक सर्व घटकांची वाहतूक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होण्याकरिता या चिन्हांचा वापर केला जातो. सदर चिन्हे गोलाकार असतात. अशा चिन्हांच्या माध्यमातून वाहन चालकांवर विशिष्ट बंधनं घातली जातात. या बंधनाचे उल्लंघन केल्यास अशा वाहन चालकांवर दंडरूपी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे सर्व वाहन चालकांनी अशा गोल आकाराच्या चिन्हांमधील सूचना काटेकोरपणे पाळाव्यात.

रस्त्यावरील विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन आपले लक्ष तात्काळ वेधण्याकरिता काही बंधनकारक चिन्हांचा आकार आणि रंग यामध्ये जाणीवपूर्वक बदल केलेला आहे.

थांबा : कोणत्याही छोटय़ा रस्त्यावरून एखाद्या हमरस्त्यावर वाहन आणताना वाहनचालकाने आपले वाहन पूर्णपणे थांबवून वाहतुकीच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मगच वाहन हमरस्त्यावर आणावे. याकरिता छोटय़ा रस्त्यावर हे चिन्ह प्रदर्शित केले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्ग द्या : मोठय़ा चौकांमध्ये प्रचंड वाहनांची गर्दी असताना अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या अत्यंत महत्त्वाच्या वाहनाला खुला रस्ता मिळावा याकरिता रस्त्याच्या मधोमध एक मार्गिका रिकामी ठेवली जाते. अशा ठिकाणी हे चिन्ह प्रदर्शित केले जाते. हे चिन्ह दिल्यास त्या मार्गिकेत आपले वाहन नेल्यास कायद्याचे उल्लंघन होऊन आपण दंडास पात्र ठरतो.