|| अलका फडणीस

साहित्य

Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
Keep the onion in in hot water before chopping it
Video : कोमट पाण्यात कांदा ठेवा अन् पाहा कमाल! भन्नाट किचन टिप्स वापरून बघा
The ideal right time to consume breakfast, lunch and dinner
दुपारचे जेवण कधी करावे, १२, १ की २? जाणून घ्या नाश्ता, लंच आणि डिनरची योग्य वेळ
How To Make Amchur At Home kairichi Amboshi Pickle recipe
आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच

डाळीचे पीठ २ वाटय़ा, हळद अर्धा चमचा, तिखट १ चमचा, नारळाचे दूध पाव वाटी, धणे-जिरे पूड १ चमचा, तेल तळण्यासाठी, पाणी ३ वाटय़ा, स्वच्छ रुमाल.

सारणासाठी

ओलं खोबरं २ वाटय़ा (थोडंसं भाजून घ्या), खसखस १ चमचा (भाजलेली), कोथिंबीर १ वाटी (बारीक चिरून), लिंबाचा रस २ चमचे, मीठ आणि साखर चवीप्रमाणे (हे सर्व साहित्य एकत्र करून ठेवा).

कृती

डाळीच्या पिठात हळद, तिखट, मीठ, साखर, नारळाचे दूध आणि पाणी घालून मिश्रण तयार करा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. नंतर गॅसवर ठेवून सतत ढवळत राहा. घट्ट झाल्यावर पातेल्याखाली जाड तवा ठेवून झाकण ठेवून त्याला वाफ आणावी. स्वच्छ रुमाल ओला करून पसरा. त्यावर अर्धे मिश्रण घालून नीट पसरवा. त्यावर खोबऱ्याचे सारण पसरून हलक्या हाताने ओल्या रुमालाच्या मदतीने गुंडाळी करा. त्याला त्रिकोणी आकार देऊन फ्रिजमध्ये ठेवून थंड करा म्हणजे नीट वडय़ा पडतील. वडय़ा पाडून तळून खायला द्या.