कृती
- दोन्ही हात एकमेकांना समांतर ठेवून हळूहळू वर न्यावेत. तळवे जमिनीच्या दिशेने ठेवावेत.
- बाहू कानाजवळ येऊ द्यावेत. तळहात समोर करून खांदे, कोपर व मनगटे यांच्यात हात वाकू न देता सरळ ठेवावेत.
- आता हळूहळू टाचा वर उचलून चवडय़ांवर उभे राहा. सर्व शरीराला वरच्या दिशेने ताण देऊन खेचून घ्यावे. आता सर्व शरीराचा भर टाचांवर असेल.
- चेहरा सरळ ठेवून डोळे बंद करावेत आणि काही वेळ या स्थितीत राहावे.
- श्वास नेहमीप्रमाणे नैसर्गिक असावा. अजिबात रोखून धरून नये.
फायदे
- ताडासन नियमित केल्याने पायांचे स्नायू व पंजे मजबूत होतात.
- आळस निघून जातो आणि ताजेतवाने वाटते.
- शरीराची तोलक्षमता वाढते. मानसिक संतुलन वाढण्यासही मदत होते.