हे बसून करायचे आसन आहे. वक्र म्हणजे वाकडे. हे आसन करताना शरीर वक्र होते. या आसनामुळे पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो. मानदुखी असलेल्यांनाही आराम मिळतो.

कृती

* दोन्ही पाय सरळ पुढे पसरवून दोन्ही हात बगलेत ठेवावेत. ताठ बसून नजर समोर ठेवावी.

* उजवा पाय हळूहळू गुडघ्याकडे वळवताना डावा पाय गुडघ्यापासून अगदी सरळ ठेवावा.

* त्यानंतर उजवा हात मागे घेऊन जा. हात पाठीच्या कण्याला समांतर ठेवा.

* थोडय़ा वेळानंतर डावा पाय गुडघ्याकडे वळवून हे आसन पूर्ण करा.

* त्यानंतर डाव्या हाताला उजव्या पायाच्या गुडघ्याकडे वाकडे करून जमिनीवर ठेवा.

* मान हळूहळू मागच्या बाजूला वळवून पूर्णपणे मागे पाहण्याचा प्रयत्न करा.