कल-कौशल्य
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या औरंगाबादस्थित इंडो-जर्मन टूल रूम या संस्थेने उद्योजकता आणि कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ‘कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवìकग’ हा ३०० तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे.या अभ्यासक्रमामध्ये सामान्यत: संगणकाच्या आतील यंत्रसामग्रीची देखभाल आणि दुरुस्तीचा समावेश होतो. प्रत्येक क्षेत्रातील संगणकांचा वाढता वापर लक्षात घेता संगणकाच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी कौशल्यप्राप्त उमेदवारांना कामाची चांगली संधी मिळू शकते.
या अभ्यासक्रमात विविध ऑपरेटिंग सिस्टीम्सची ओळख करून दिली जाते. संगणकाची स्मरणशक्ती (मेमरी), माहिती साठवण्याची क्षमता (स्टोअरेज), संगणकाच्या विविध भागांची जोडणी (असेम्िंब्लग), संगणक बिघडण्यासंदर्भातील विविध समस्या आणि त्यांचे निराकरण (ट्रबलशूटिंग) आणि नेटकवìकगचे विविध सिद्धांत यांचा समावेश करण्यात आला आहे.
दहावी उत्तीर्ण उमेदवाराला हा अभ्यासक्रम करता येतो. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर पहिल्या
२५ उमेदवारांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. निवड झालेल्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण दिले जाते.हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या आणि किमान ९० टक्के उपस्थिती असलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाते.याच योजनेंतर्गत डेस्कटॉप पब्लििशग या १२५ तास कालावधीच्या अभ्यासक्रमाला ७५ विद्यार्थ्यांना आणि एम.एस ऑफिस आणि इंटरनेट या १२५ तासांच्या अभ्यासक्रमास २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हे अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्यांनी एकावेळी कोणत्याही एकाच अभ्यासक्रमासाठी अर्ज करावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संस्थेचा पत्ता :
इंडो-जर्मन टूल रूम,
पी-३१, एमआयडीसी,
चिखलठाणा इंडस्ट्रिअल एरिया,
औरंगाबाद- ४३१००६.
वेबसाइट : http://www.igtr-aur.org
www-igtr.gov.in