एका सर्वेक्षणानुसार मुंबईच्या रस्त्यावर दररोज तीनशेच्या आसपास नव्या चारचाकी गाडय़ा येतात. देशात चारचाकी वाहनांचे उत्पादन वाढत आहे. क्रयशक्तीत झालेली वाढ आणि बँकांकडून सुलभतेने मिळणारे कर्ज यामुळे चारचाकी वाहनांच्या खरेदीला चालना मिळाली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या देखभाल-दुरुस्ती सेवांना मोठी मागणी आहे. त्यासाठी या विषयातील तंत्रकुशल उमेदवारांची निकड मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे.
ही बाब लक्षात घेत खादी आणि ग्रामोद्योग या शासकीय संस्थेने ‘फोर व्हीलर पेट्रोल कार मेन्टनन्स’ हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रीमिअर, मारुती, ह्युंदाई, टाटा आदी आधुनिक चारचाकी वाहनांचे देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये इंजिन दुरुस्ती, अॅक्सल क्लच, सस्पेंशन, गिअर बॉक्स, ब्रेक आणि या वाहनांच्या इतर भागांच्या दुरुस्तीच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. हे प्रशिक्षण १५ दिवसांचे आहे. ३० इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. किमान दहावी उत्तीर्ण आणि १६ वष्रे वय असलेल्या उमेदवारांना या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळू शकतो.
प्रशिक्षणाची ठिकाणे :
१) नियमित बॅच- जी- २, क्रमांक ५ अव्हेन्यू, बिझनेस पार्क, दुर्गाडी चौक,
कल्याण (पश्चिम)- ४२१३०१.
२) शनिवार-रविवार बॅच- ३०/३१, डिव्हाइन शेरेटन प्लाझा, जैन मंदिराजवळ भाईंदर (पश्चिम), मुंबई- ४०११०५.
स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना आयोगामार्फत राबवली जाते. त्याविषयी या प्रशिक्षणकाळात माहिती दिली जाते.
संस्थेचा पत्ता-
सी. बी. कोरा इन्स्टिटय़ूट, िशपोली गाव, गावदेवी मदानाजवळ, महापालिका शाळेसमोर, िशपोली रोड, बोरिवली (पश्चिम)
मुंबई-४०००९२.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2015 रोजी प्रकाशित
मोटार देखभाल प्रशिक्षणक्रम
एका सर्वेक्षणानुसार मुंबईच्या रस्त्यावर दररोज तीनशेच्या आसपास नव्या चारचाकी गाडय़ा येतात
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
First published on: 16-12-2015 at 09:55 IST
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motor maintenance programs