News Flash

डाळिंबामुळे ‘या’ शारीरिक तक्रारी होतील दूर; जाणून घ्या १३ गुणकारी फायदे

डाळींब खाण्याचे फायदे

शरीराच्या योग्य वाढीसाठी भाज्या, कडधान्य यांच्यासोबतच फळांचं सेवन करणंदेखील तितकंच आवश्यक आहे. प्रत्येक फळामध्ये काही खास गुणधर्म असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे अनेकदा डॉक्टरदेखील रुग्णांना फळे खाण्याचा सल्ला देतात. साधारणपणे पेरु, चिक्कू, द्राक्ष ही फळे आवर्जुन खाल्ली जातात. मात्र, डाळींब, संत्री अशी सालं सोलून खाण्याची फळं फार कमी प्रमाणात खाल्ली जातात. यात डाळींब सोलणं हे एकप्रकारचं दिव्यच असतं. त्यामुळे अनेक जण डाळींब खाण्यास कंटाळा करतात. परंतु, डाळींब खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

डाळींब खाण्याचे फायदे

१. चेहऱ्यावरील तेज वाढते.

२. अपचन, आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

३. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

४.घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.

५. मूळव्याधीचा त्रास कमी होतो.

६. ताप आल्यास डाळींब खावं. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

७. डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.

८. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.

९. अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

१०. जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.

११. हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

१२. रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

१३. जुनाट खोकला नाहीसा होतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2020 5:09 pm

Web Title: 13 health benefits of pomegranate ssj 93
Next Stories
1 Nokia ची आता भारतात लॅपटॉप सेगमेंटमध्ये एंट्री, Nokia PureBook X14 झाला लाँच; किंमत…
2 iPhone मध्ये आला Bug, युजर्सना मिळत नाहीये SMS नोटिफिकेशन
3 Gmail वापरणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, आता Attachments मध्येच डॉक्युमेंट्सही करता येणार Edit
Just Now!
X