News Flash

नव्या WagonR साठी 11 हजारांत बुकिंग सुरू, 23 जानेवारीला होणार लाँच

गाडीचे रूपडे आतून आणि बाहेरून बदललेले दिसणार

(छायाचित्र सौजन्य - एनडीटीव्ही)

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मारुती सुझुकीच्या नव्या WagonR साठी बुकिंग सुरू झाली आहे. मारुती सुझुकीचे अधिकृत विक्रेते (डिलर्स) आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन या कारसाठी नोंदणी करता येईल. 11 हजार रुपयांमध्ये या कारसाठी बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. कंपनीने नव्या WagonR चा टीझर व्हिडीओ जारी करुन याबाबत माहिती दिलीये.

मारुती सुझुकी आपली लोकप्रिय हॅचबॅक WagonR नव्या रुपात लाँच करणार आहे. 23 जानेवारी रोजी ही कार भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या वॅगनआरच्या लाँचिंगआधीच अनेक फिचर्सचा खुलासा झाला आहे. नव्या WagonR ची टाटा टिआगो, नवी सँट्रो, दॅटसन गो यांसारख्या कारशी थेट टक्कर असेल. त्यामुळेच कंपनी या कारला लेटेस्ट फिचर्ससह बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे.

या कारचं डिझाइन टॉल बॉयप्रमाणेच असेल. गाडीचे रूपडे आतून आणि बाहेरून बदललेले दिसणार आहे. पहिल्या वॅगनआरच्या तुलनेने ही गाडी अधिक मोठी असणार आहे. गाडीत सात इंचाची टाचस्क्रीनसह इंफोटेनमेन्ट प्रणाली असणार आहे. गाडी ही नव्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली असून पूर्वीच्या मॉडेलहून वजनाने हलकी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जुन्या कारच्या तुलनेत नव्या कारचं वजन 50 ते 65 किलो कमी असू शकतं. गाडीत 1 लिटरचे 68 बीएचपी ऊर्जा निर्माण करणारे इंजिन असणार आहे. नवी वॅगनआर 51 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येणार आहे. गाडीचे मायलेज चांगले असल्यास गाडी ग्राहकांच्या पसंतीला उतरण्याची शक्यता आहे. गाडी पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजी व्हर्जनमध्येदेखील उपलब्ध केली जाणार आहे. 23 जानेवारी रोजी ही गाडी बाजारात दाखल होण्याची शक्यता असून किंमत 4.5 ते 6.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. नवी वॅगनआर सात व्हेरिअंट्समध्ये बाजारात लाँच केली जाईल. यामध्ये तीन व्हेरिअंट 1.0-लीटर इंजिनचे आणि चार व्हेरिअंट 1.2-लीटर इंजिनचे असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 5:17 pm

Web Title: 2019 maruti suzuki wagon r bookings open
Next Stories
1 शानदार फीचर्ससह येतेय बजाजची Dominar 400
2 यंदा सक्रांतीला व्हॉट्सअप स्टीकर्स पाठवून द्या शुभेच्छा; जाणून घ्या कशाप्रकारे
3 जाणून घ्या भोगीचे महत्त्व
Just Now!
X