News Flash

फ्लिपकार्टवर सुरू झाला Realme Days Sale, या स्मार्टफोनच्या खरेदीवर होईल 10 हजारांची बचत

९ जानेवारीपर्यंत स्वस्तात फोन खरेदी करण्याची संधी

(Realme X50 Pro 5G )

नवीन वर्षामध्ये रिअलमी कंपनीच्या ‘रिअलमी डेज सेल’ला ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सुरूवात झालीये. 9 जानेवारीपर्यंत हा सेल सुरू असेल. सेलमध्ये ग्राहकांना अनेक शानदार ऑफर आणि मोबाइल्सवर डिस्काउंट मिळेल. जाणून घेऊया या सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोनवर डिस्काउंट आहे.

Realme 6 : सेलमध्ये कंपनीच्या रिअलमी 6 स्मार्टफोनवर दोन हजार रुपयांची सूट मिळेल. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंट असलेला Realme 6 हा फोन सेलमध्ये 14 हजार 999 रुपयांऐवजी 12 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Realme Narzo 20 : सेलमध्ये ग्राहक हा स्मार्टफोन (6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज) 14 हजार 999 रुपयांऐवजी 13 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. म्हणजेच या फोनवर एक हजार रुपयांची बचत होऊ शकते.

आणखी वाचा- Xiaomi Mi 10i भारतात झाला लाँच, मिळेल तब्बल 108MP कॅमेरा; जाणून घ्या डिटेल्स

Realme X3 Superzoom : सेलमध्ये रिअलमी एक्स3 सुपरझूम हा स्मार्टफोन (8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज) 27 हजार 999 रुपयांऐवजी 23 हजार 999 रुपयांमध्ये मिळेल. म्हणजेच या फोनच्या खरेदीवर 4 हजार रुपयांची बचत होऊ शकते.

आणखी वाचा- स्वस्त झाला Nokia चा पाच कॅमेऱ्यांचा जबरदस्त स्मार्टफोन, किंमत 15 हजारांपेक्षा कमी

Realme X50 Pro 5G : याशिवाय सेलमध्ये Realme X50 Pro 5G या स्मार्टफोनवर सर्वाधिक डिस्काउंट मिळेल. या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटला सेलमध्ये 31 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या व्हेरिअंटची किंमत सध्या 41 हजार 999 रुपये आहे. म्हणजेच सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर 10 हजार रुपयांची बचत होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 2:05 pm

Web Title: 2021 realme days sale on flipkart begins check deals and offers sas 89
Next Stories
1 धक्कादायक! तब्बल 10 कोटी भारतीयांचा चोरीला गेलेला क्रेडिट-डेबिट कार्ड डेटा इंटरनेटवर विक्रीला
2 प्रतीक्षा संपली! अखेर अक्षय कुमारने केली FAU-G च्या लाँचिंगची घोषणा, जाणून घ्या डिटेल्स
3 काय सांगता…आता Honda च्या गाड्यांवर ‘स्पेशल मास्क’, Corona ला दूर ठेवण्यासाठी भन्नाट आयडिया
Just Now!
X